भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं

By admin | Published: September 28, 2016 11:48 AM2016-09-28T11:48:20+5:302016-09-28T11:57:00+5:30

भारताच्या संयमी धोरणाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये,असं अमेरिकेतील मीडियानं म्हटले आहे. भारताने पाकिस्तानविरोधी अवलंबलेल्या धोरणांबाबत अमेरिकन मीडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे

Pakistan should not assume the sway of India, the American media racked up | भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं

भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं

Next

ऑनलाइन लोकमत

वॉशिंटन, दि.28 - भारताने पाकिस्तानविरोधी अवलंबलेल्या धोरणांबाबत अमेरिकन प्रसारमाध्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. 'भारताच्या संयमी धोरणाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्याचा प्रस्ताव पाकिस्तान नाकारत असेल, तर पाकिस्तान जगासाठी बहिष्कृत राष्ट्र म्हणून निर्माण होईल,' असा दावा अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये करण्यात आला आहे.
 
सीमेवर पाकिस्तानी लष्कर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असेल, तर याविरोधात मोदींनी कठोर भूमिका घेतल्यास ते समर्थनीय ठरू शकेल, असे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे. भारतानं दहशतवाद विषयावर नेहमीच नैतिकता बाळगली आहे. मात्र आधीच काँग्रेस आणि भाजपा सरकार ही बाब कठोरपणे मांडू शकले नाहीत, असंही वॉल स्ट्रिट जर्नलनं म्हटले आहे. यामुळेच पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले कितीही भीषण असले तरी पाकिस्तान ही बाब कधीही मान्य करणार नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. 
 
 
दहशतवादावरुन कोंडी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी अवलंबलेल्या धोरणाचं कौतुक देखील करण्यात आले आहे. 1960 चा सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा निर्णय, मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून पाकिस्तानला दिलेल्या दर्जाचा देखील भारताकडून पुर्नविचार होण्याची शक्यता आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर यासारख्या अनेक निर्णयाद्वारे जागतिक पातळीवर भारत पाकिस्तानला  दहशतवाद पुरस्कृत देश म्हणून सिद्ध करण्यास यशस्वी होईल, जे नाकारणं कठीण असेल असा दावाही अमेरिकन प्रसारमाध्यमांनी केला आहे.
 

 

Web Title: Pakistan should not assume the sway of India, the American media racked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.