पाकिस्तानने भारताला दंड द्यावा : न्यायालय
By Admin | Published: March 23, 2015 01:26 AM2015-03-23T01:26:06+5:302015-03-23T01:26:06+5:30
६७ वर्षे चाललेल्या खटल्यात कायदेशीर शुल्क म्हणून पाकिस्तानने भारताला १ लाख ५० हजार पौंड द्यावेत, असा निकाल इंग्लंडमधील एका न्यायालयाने दिला असून, पाकसाठी हा जबर धक्का आहे.
लंडन : भारतातील सर्वांत श्रीमंत संस्थानिक असणाऱ्या हैदराबादच्या निजामाच्या पैशासंदर्भात न्यायालयात ६७ वर्षे चाललेल्या खटल्यात कायदेशीर शुल्क म्हणून पाकिस्तानने भारताला १ लाख ५० हजार पौंड द्यावेत, असा निकाल इंग्लंडमधील एका न्यायालयाने दिला असून, पाकसाठी हा जबर धक्का आहे.
पाकला याप्रकरणी सार्वभौमिक सुरक्षा नाही, असे स्पष्ट करीत न्यायमूर्तींनी पाकच्या उच्चायुक्तांना हैदराबाद निधी प्रकरणातील कायद्याचा खर्च म्हणून ही रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. हैदराबाद फंडस् ही रक्कम सध्या ३५ दशलक्ष पौंड किमतीची आहे. या निकालामुळे संरक्षण उठले. असून, भारताला गोठवलेल्या निधीतून आपले पैसे मोकळे करण्याचा कायदेशीर मार्ग खुला झाला आहे. यासंदर्भात भारत सरकार व निजामाचे वारस यांची चर्चा सुरू असल्याचेही विश्वासार्ह वृत्त आहे. (वृत्तसंस्था)