पाकने ‘जिओ’चे प्रसारण रोखले
By Admin | Published: June 6, 2014 10:32 PM2014-06-06T22:32:35+5:302014-06-06T22:32:35+5:30
पाकिस्तानी माध्यम नियामक प्राधिकरणाने आज ‘जिओ न्यूज’चा प्रसारण परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे.
>इस्लामाबाद : पाकिस्तानी माध्यम नियामक प्राधिकरणाने आज ‘जिओ न्यूज’चा प्रसारण परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे. पाक लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआय यांची बदनामी केल्याप्रकरणी एक कोटी रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या आघाडीच्या वृत्तवाहिनीने गुरुवारीच आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत देशातील काही सरकारी संस्थांविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक नियामक प्राधिकरण अर्थात ‘पेमरा’ने ही घोषणा केली. प्राधिकरणाचे प्रमुख परवेध राठौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
‘प्राधिकरणाने सखोल विचारविनिमयानंतर पेमरा कायद्यांतर्गत तरतुदींन्वये कारवाईचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)
जिओ न्यूजने कायद्याचे उल्लंघन केल्याची गंभीर दखल घेत त्यांचा प्रसारण परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असून त्यांच्याकडून एक कोटी रुपये एवढा दंड आकारला जाणार आहे. दंडाची ही रक्कम परवाना निलंबनाची मर्यादा संपेर्पयत भरावी लागणार आहे,’ असे प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दंडाची रक्कम नियत कालावधीत न भरल्यास परवाना निलंबनाची कारवाई कायम राहणार आहे. परवानाधारकाकडून वेळोवेळी नियमांचे उल्लंघन झाल्याच्या स्थितीमध्ये प्राधिकरणाकडून परवाना रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
———————
संरक्षण मंत्रलयाने केली होती बंदीची मागणी
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रलयाने जिओ न्यूजचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. जिओने वाहिनीचे संपादक हमीद मीर यांच्यावरील हल्ल्यास आयएसआय जबाबदार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. चॅनलचा मालकी हक्क असलेल्या जिओ टीव्ही नेटवर्क आणि जंग समूहाने सैन्य आणि आयएसआयकडे माफीची मागणी केली होती.
परवाना रद्द करण्याच्या एक दिवसापूर्वी जिओ आणि जंग समूहाने संरक्षण मंत्रलय, आयएसआय आणि पेमरा यांना नोटीस जारी केली होती. वृत्तसमूहाची बदनामी केल्याप्रकरणी या संस्थांनी 14 दिवसांच्या आत सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि 5क् अब्ज डॉलरची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती.