पाकिस्तानकडून करण्यात आली नव्या रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी; लष्कराने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:53 IST2023-12-28T15:51:06+5:302023-12-28T15:53:27+5:30
लष्कराच्या मीडिया सेंटर 'इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स' (ISPR) ने एका निवेदनात दिली माहिती

पाकिस्तानकडून करण्यात आली नव्या रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी; लष्कराने केला दावा
Fatah 2 Pakistan test Rocket System: पाकिस्तानने बुधवारी स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली 'फतह-2'ची यशस्वी उड्डाण चाचणी केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या लष्कराने ही माहिती दिली. ही रॉकेट प्रणाली उच्च अचूकतेसह ४०० किलोमीटर अंतरापर्यंतचे कोणतेही लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे, असे लष्कराच्या मीडिया सेंटर 'इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स' (ISPR) ने एका निवेदनात म्हटले आहे. चाचणीच्या वेळी लष्कराच्या तिन्ही सेवेतील वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ आणि अभियंते उपस्थित होते, असे त्यात म्हटले आहे.
ऑक्टोबरच्या उत्तरार्धात 'अबाबील' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीच्या उड्डाण चाचणीच्या एका आठवड्यानंतर पाकिस्तानने 'गौरी' शस्त्र प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. ऑगस्ट २०२१ मध्ये, पाकिस्तानने स्वदेशी फतेह-१ रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. मात्र, पाकिस्तान युक्रेनला आपली शस्त्रे पुरवू शकतो, असे मानले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, पाकिस्तानने युक्रेनला मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर्समध्ये वापरल्या जाणार्या 10 हजारांहून अधिक रॉकेटचा पुरवठा केल्याचे अनेक अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, काही महिन्यांनंतर युक्रेनच्या कमांडरने सांगितले की, पाकिस्तानकडून पुरविण्यात आलेला दारूगोळा दर्जेदार नाही. गेल्या वर्षी यूकेने भूमध्य समुद्रातील ब्रिटीश हवाई तळावरून रोमानियाच्या अवराम इयानकू क्लुज विमानतळावर युक्रेनसाठी नियत शस्त्रे हलविण्यासाठी रावळपिंडी येथील पाकिस्तानी हवाई दलाचा वापर केला. त्यावेळी रशियाने या घडामोडीची जाणीव असल्याचे म्हटले होते.