अमेरिकेने डोळे वटारल्यावर पाकिस्तानने घेतला यू-टर्न! भारताचे नाव घेऊन क्षेपणास्त्रावर दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:55 IST2024-12-22T13:44:12+5:302024-12-22T13:55:28+5:30
पाकिस्तानच्या नव्या क्षेपणास्त्रावरुन वाद सुरू झाला आहे. अमेरिकेने यावरुन प्रतिक्रिया दिली होती.

अमेरिकेने डोळे वटारल्यावर पाकिस्तानने घेतला यू-टर्न! भारताचे नाव घेऊन क्षेपणास्त्रावर दिले स्पष्टीकरण
अमेरिकेने पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेचे सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे वर्णन केले आहे आणि ते प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी आव्हान असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर अमेरिकेने टीका केली होती.
Video: सीरियात महागाईचा भस्मासुर! एक कप कॉफी खरेदीसाठी द्यावा लागतो नोटांचा बंडल
दरम्यान, आता अमेरिकेच्या वक्तव्यावर पाकिस्तानचे प्रत्युत्तर आले आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या दाव्यांवर आक्षेप घेत ते नाकारले आणि त्यांना तर्कहीन म्हटले आहे. पाकिस्तानने असे क्षेपणास्त्र बनवले आहे, जे अमेरिकेलाही मारा करू शकते, असे अमेरिकेने म्हटले होते.
अमेरिकेच्या आरोपानंतर पाकिस्तानने म्हटले की, हे सर्व बेताल आरोप आहेत. शेजारी देशाने म्हटले की, मोठ्या गैर-नाटो देशावर असे आरोप दोघांमधील संबंध बिघडू शकतात. आम्ही कधीही अमेरिकेबद्दल वाईट इच्छा बाळगली नाही आणि संबंध टिकवून ठेवण्यासाठी अनेक त्यागही केले. तसेच अमेरिकन धोरणाचा फटका बसला आहे, असंही पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी सांगितले की, त्यांचा देश क्षेपणास्त्र क्षमता विकसित करत राहील. यासोबतच पाकिस्तानच्या मनात भारताची भीतीही दिसत होती. भारताकडून निर्माण होणारे धोके लक्षात घेता हे क्षेपणास्त्र कार्यक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे बलोच यांनी यावेळी सांगितले.
मुमताज जहरा बलोच म्हणाल्या की, अमेरिकन अधिकाऱ्याने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र क्षमता आणि वितरण साधनांना दिलेला कथित धोका दुर्दैवी आहे. हे आरोप बिनबुडाचे, तर्कहीन आणि इतिहासाचे आकलन नसलेले आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फाइनर यांनी सांगितले की, पाकिस्तान अमेरिकेसह दक्षिण आशियापासून दूरपर्यंत मारा करू शकणारी लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. या क्षेपणास्त्राची रेंज अमेरिकेपर्यंत असू शकते, असे ते म्हणाले होते.