सुरक्षेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानचं पथक भारतात दाखल
By admin | Published: March 7, 2016 10:41 AM2016-03-07T10:41:43+5:302016-03-07T10:44:54+5:30
पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात येण्याआधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचं 2 सदस्यीय पथक भारतात पोहोचलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत,
हिमाचल प्रदेश, दि. ७ - पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात येण्याआधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचं 2 सदस्यीय पथक भारतात पोहोचलं आहे. पाकिस्तानी पथक धरमशाला येथे जाऊन सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करणार आहे. पथकाने दिलेल्या अहवालानंतरच पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणार की नाही हे ठरणार आहे.
धरमशाला येथे भारत- पाकिस्तान सामना होणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सुरक्षा पुरवण्यास असमर्थ असल्यांचं केंद्राला सांगितलं आहे. तर बीसीसीआयने हा सामना तिथेच होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाकिस्तान सरकारने सुरक्षेची चिंता व्यक्त करत सुरक्षेची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्याचा निर्णय घेतला होता. जर अहवाल सकारात्मक असेल तरच पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात जाईल अशी माहिती पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी दिली होती. त्यामुळे पाकिस्तानी पथकाने दिलेल्या अहवालावरच पाकिस्तान संघाचं भवितव्य ठरणार आहे.
Two member team from Pakistan arrives in India,will go to Dharamsala to review security arrangements #WT20pic.twitter.com/zpSw9zHviu
— ANI (@ANI_news) March 7, 2016