Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 10 सैनिकांचा मृत्यू, एका दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:13 AM2022-01-28T08:13:29+5:302022-01-28T08:23:47+5:30

Pakistan Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर काही सैनिक जखमी झाले आहेत. 

Pakistan Terrorist Attack 10 soldiers killed in terror attack in pakistan balochistan province | Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 10 सैनिकांचा मृत्यू, एका दहशतवाद्याचा खात्मा

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 10 सैनिकांचा मृत्यू, एका दहशतवाद्याचा खात्मा

googlenewsNext

पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये (Pakistan Terrorist Attack) पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी सैन्याचे मीडिया विंग इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बलुचिस्तानच्या केच जिल्हातील सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला करत गोळीबार केला. या गोळीबारात जवळपास 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर काही सैनिक जखमी झाले आहेत. 

पाकिस्तानी सैन्याने जारी केलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ला 25 आणि 26 जानेवारीच्या रात्री घडला आहे. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून जागोजागी अलर्टही जारी करण्यात आल्याचं म्हटलं आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. 

पाकिस्तानात दरमहा दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ

डॉन वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षादलाने केलेल्या कारवाईमध्ये एकून तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आलं आहे. दरम्यान, अजूनही या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जात आहे. जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, सशस्त्र बल पाकिस्तानातून अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी कटीबद्ध असून त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला पाकिस्तान तयार आहे, असं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानात दरमहा दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: Pakistan Terrorist Attack 10 soldiers killed in terror attack in pakistan balochistan province

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.