पाकमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 60 ठार

By admin | Published: October 25, 2016 12:56 AM2016-10-25T00:56:12+5:302016-10-25T09:55:59+5:30

पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये सात पोलीस जखमी झाले आहेत.

In Pakistan, a terrorist attack on police training center, 60 killed | पाकमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 60 ठार

पाकमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 60 ठार

Next
ऑनलाइन लोकमत
क्वेटा, दि. २५ - पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 60 पोलिसांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा येथे सारयाब रोडवर असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर पाच ते सहा दहशतवादी सोमवारी रात्री गोळीबार करत सेंटरमध्ये घुसले. यावेळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला. मात्र दहशतवादी सेंटरमध्ये घुसल्यामुळे त्यांनी केलेल्या हल्ल्यात 60 पोलिसांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, सेंटरमधील होस्टेलमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीसांना काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. सेंटरमध्ये 500 हून अधिक प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत. आत्तापर्यंत 200 प्रशिक्षणार्थी पोलीसांची सुखरुप सुटका करण्यात आली असून ऑपरेशन सुरु आहे.   
सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दहशतवाद्यांनी सेंटरच्या समोरच्या गेटमधून प्रवेश करत गोळीबार केला. तसेच, होस्टेलमध्ये असलेल्या 200 हून अधिक प्रशिक्षणार्थी पोलीसांना ओलीस ठेवले असल्याची माहिती येथील एका पोलीस अधिका-यांने दिली. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील तहरिक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने ट्विटरच्या माध्यमातून हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. 

Web Title: In Pakistan, a terrorist attack on police training center, 60 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.