पाकिस्तान एक दहशतवादी देश - भारत
By admin | Published: September 22, 2016 10:16 AM2016-09-22T10:16:15+5:302016-09-22T10:43:07+5:30
नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्यावरुन भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्ये सडेतोड उत्तर दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. २२ - संयुक्त राष्ट्रामध्ये नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्यावरुन भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्ये सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तान एक दहशतवादी देश असून, दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानचे जे जुने धोरण आहे त्यातून पाकिस्तान भारता विरोधात युद्ध गुन्हे करत आला आहे असे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे असे दहशतवादी पाकिस्तानच्या रस्त्यावर राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मोकळेपणाने फिरत आहेत असे भारताने म्हटले आहे. मानवी हक्काचे सर्वात वाईट उल्लंघन कुठले असेल तर तो दहशतवाद आहे असे संयुक्त राष्ट्रातील परमनंट मिशनमधील भारताच्या सचिव इनाम गंभीर म्हणाल्या.
आणखी वाचा
दहशतवादाचा तुम्ही धोरणासारखा वापर करता तेव्हा तो युद्ध गुन्हा ठरतो. दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानच्या धोरणाचे परिणाम भारत आणि अन्य शेजारी देशांना भोगावे लागत आहेत. आज जगातील अनेक देश यामुळे त्रस्त आहेत असे त्या म्हणाल्या.
भारत पाकिस्तानकडे दहशतवादी देश म्हणून बघतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीच्या स्वरुपात मिळणा-या अब्जावधी डॉलर्सचा पाकिस्तान दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपयोग करतो असे भारताने म्हटले आहे.