बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला मोठा धक्का, संघटनेचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:47 IST2025-03-16T13:47:04+5:302025-03-16T13:47:31+5:30

Bashir Zeb Shot Dead: पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक करणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीला मोठा धक्का बसला आहे.

Pakistan Train Hijack, Balochistan Liberation Army suffers major setback, organization's chief Bashir Zeb shot dead | बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला मोठा धक्का, संघटनेचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला मोठा धक्का, संघटनेचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या

Bashir Zeb Shot Dead: काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) जाफर एक्स्प्रेस हायजॅक करुन संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली होती. त्या ट्रेनमध्ये सुमारे 440 प्रवासी होते. बलुचिस्तानची प्रांतीय राजधानी क्वेटा येथून उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी पेशावरकडे जात असताना रेल्वे रुळ उडवून ट्रेन ताब्यात घेण्यात आली. 

दरम्यान, आता याच बलुच लिबरेशन आर्मीला मोठा झटका बसला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेब याची इराकमध्ये हत्या करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी बशीर झेबने आपल्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. आता त्याचा संशय खरा ठरला अन् तो ज्या ठिकाणी लपला होता, त्याच ठिकाणी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

2018 पासून संघटनेचे नेृत्व
बशीर झेब याच्याकडे 2018 मध्ये बीएलएचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. प्रमुख होण्यापूर्वी तो संघटनेच्या कोअर कमिटीचा प्रमुख सदस्य होता. त्याच्या नेतृत्वाखाली बलुचिस्तानमध्ये बीएलएच्या कारवाया तीव्र झाल्या, संपूर्ण प्रदेशात संघटनेची उपस्थिती आणि प्रभाव वाढला. पाकिस्तानातील बड्या नेत्यांनाही बलुचिस्तानवरील सरकारचे नियंत्रण हळूहळू कमकुवत होत असल्याचे मान्य करावे लागले होते.

वडील डॉक्टर, मुलगा बीएलए प्रमुख
बशीर झेबने अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि 2012 मध्ये BLA च्या "आझाद मिशन" अंतर्गत संघटनेत सामील झाला आणि तेव्हापासून संघटनेत सक्रियपणे काम करत होता. त्याचे वडील बलुचिस्तानचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्याचे घर प्रांतीय राजधानी क्वेटापासून 145 किलोमीटर पूर्वेला असलेल्या नुष्की शहरात आहे. बशीर झेब हसनी जमातीचा होता, जो दक्षिण बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या सर्वात मोठ्या जमातींपैकी एक आहे. 

बशीरमुळे बीएलए अधिक मजबूत झाली
संघटनेचे नेतृत्व मिळाल्यानंतर बशीर झेबने आत्मघाती बॉम्बर तयार केले, ज्यात विशेषतः बलुच महिलांचा समावेश होता. या महिला बुरख्याखाली बॉम्ब जॅकेट घालून हल्ले करायच्या. झेबच्या नेतृत्वाखाली बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) केवळ पाकिस्तानी लष्करावरच हल्ला केला नाही, तर चिनी सैनिकांनाही लक्ष्य केले. त्याचे तालिबानशीही जवळचे संबंध होते, त्यामुळे या भागात पाकिस्तानी लष्कर असहाय्य वाटायचे. याशिवाय बशीरने बीएलएमध्ये नवीन आणि शिक्षित तरुणांचा समावेश केला, ज्यामुळे संघटना पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाली. या बदलामुळे आता पाकिस्तानी लष्कराला बीएलएसमोर सातत्याने माघार घ्यावी लागत आहे.

Web Title: Pakistan Train Hijack, Balochistan Liberation Army suffers major setback, organization's chief Bashir Zeb shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.