पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 08:51 PM2019-09-21T20:51:18+5:302019-09-21T20:52:07+5:30

'हाऊडी मोदी' च्या विरोधात काश्मीरी आणि खलिस्तानी शक्तीही कार्यरत झाल्या आहेत.

Pakistan trying to overthrow 'Howdy Modi' program | पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात

पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात

Next

नवी दिल्ली : अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरामध्ये 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम होणार असून त्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आहेत. मात्र, पाकिस्तान हा कार्यक्रम कसा उधळता येईल याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे जे लोक यामागे आहेत ते पाकिस्तान सरकारचे नसून सत्तारूढ इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाशी संबंधित आहेत. 


'हाऊडी मोदी' च्या विरोधात काश्मीरी आणि खलिस्तानी शक्तीही कार्यरत झाल्या आहेत. वेगवेगळ्या संघटना आणि गटांमध्ये असलेले हे विरोधक मोदी यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत. मात्र, पाकिस्तानचे लोक या गटांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मोदींच्या विरोधात तीन मोठी आंदोलने करण्यात येणार आहेत. यामध्ये 'अनवलेकम मोदी', 'काश्मीर रॅली' आणि  'आईएचएफ़ प्रोटेस्ट' आहे. याशिवाय खलिस्तानी समर्थकांनी 'गो बॅक मोदी' अशीही मोहिम सुरू केली आहे. 


इंडिया टुडेनुसार पाकिस्तानच्या पीटाआयचे कार्यकर्ते या आंदोलनकर्त्यांना हाऊडी मोदीच्या कार्यक्रम स्थळावर जाण्यासाठी मोफत बस देणार आहेत. त्यांच्यापैकी एकाने फेसबूक पेजवर लोकांना कार्यक्रमामध्ये झालेल्या बदलाची माहिती दिली आहे. फैयाज खलील असे त्याचे नाव असून त्याने पीटीआयचा युवा संघटनेचा संस्थापक सदस्य असल्याचे म्हटले आहे. 


याशिवाय खलिस्तानी समर्थक ग़ज़ाला हबीबनेही खलिस्तानी आंदोलकांना आवाहन केले आहे. तिने पाकिस्तानी राजदूत एजाज अहमद यांच्याशी चर्चा केल्याचेही म्हटले आहे. तिने आंदोलकांना कोणत्या मेट्रोने कसे जायचे याबाबत सांगितले आहे. तसेच मोफत बस कुठून मिळेल हे देखील सांगितले आहे. 


फेसबूक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडियावर अनेक अकाऊंट उघडून मोदींना विरोध आणि आंदोलनाची रूपरेषा आखण्यात येत आहे. तर काही ठिकाणी अमेरिकेतील मशिदींकडे जमा होण्याचे आणि बस मिळणार असल्याचे आवाहन करण्याच येत आहे. मोदी यांचे उद्या एनआरजी स्टेडियमवर आगमन होणार आहे.

Web Title: Pakistan trying to overthrow 'Howdy Modi' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.