सर्वात मोठं सेक्स स्कँडल, विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५५०० अश्लील व्हिडीओ, एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 09:33 AM2023-07-29T09:33:49+5:302023-07-29T09:35:45+5:30
Pakistan University Sex Scandal: पाकिस्तानमध्ये एका मोठ्या सेक्स स्कँडलचा भांडाफोड झाला असून, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोरपासून कराचीपर्यंत खळबळ उडाली आहे. हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचेही सांगण्यात येत आहे.
आर्थिक संकट, दहशतवादी कारवाया यामुळे होरपळत असलेल्या पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती खूप वाईट आहे. येथे प्राथमिक शाळेतील मुली असोत वा विद्यापीठात शिकत असलेल्या तरुणी असोत, कुणीही सुरक्षित नाही आहेत. दरम्यान, पाकिस्तानमध्ये एका मोठ्या सेक्स स्कँडलचा भांडाफोड झाला असून, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोरपासून कराचीपर्यंत खळबळ उडाली आहे. हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामध्ये तब्बल ५५०० कॉलेज विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये इस्लामिया युनिव्हर्सिटीमधील शेकडो विद्यार्थिनींचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून या विद्यापीठामधील विद्यार्थिनींना याच विद्यापीठात काम करणारे लोक ब्लॅकमेल करत होते. पाकिस्तान सरकारने बहावलपूरच्या इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या या लाजीरवाण्या घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये तीन कुलगुरू आणि सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
पाकिस्तानी मीडियामधील वृत्तानुसार या सेक्स स्कँडलमागे पाकिस्तानमधील केंद्र सरकारमध्ये समावेश असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा हात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी या नेत्याच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे, तर काही वाहिन्यांकडून त्याचं नाव लपवलं जात आहे. दरम्यान, हे मंत्री आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असाही आरोप करण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील बहावलपूर विद्यापीठात नेमकं काय घडलंय, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.विद्यापीठामधील विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. या धक्कादायक प्रकारामागे विद्यापीठातील चीफ सिक्युरिटी ऑफिसर आणि इतर काही प्राध्यापक सहभागी होते. चिफ सिक्युरिटी ऑफिसरच्या मोबाईलमधून ५५०० अश्लील व्हिडीओ आणि फोटो मिळाले आहेत. हे अश्लील व्हिडीओ आणि फोटो विद्यापीठातील विद्यार्थिनींचे आहेत. तसेच पोलिसांना तपासादरम्यान, मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठाही सापडला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूर विद्यापीठामध्ये संपूर्ण पाकिस्तानमधून विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यापीठामध्ये सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. पाकिस्तानमधील उच्च शिक्षण आयोगाने २०१९ मध्ये या विद्यापीठाचा देशातील तिसरे सर्वात यांचे विद्यापीठ असा उल्लेख केला होता. दरम्यान, पाकिस्तानमधील विद्यापीठात घडलेल्या सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलची जगभरात चर्चा होत आहे.