पाकिस्तान नवीन वर्ष साजरे करणार नाही; 'या' कारणासाठी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 08:08 AM2023-12-29T08:08:08+5:302023-12-29T08:10:14+5:30
काळजीवाहू पंतप्रधान काकर यांनी नवीन वर्ष साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी नवीन वर्ष साजरे करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांना गाझामधील लोकांसाठी देशात नवीन वर्ष साजरे करण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली.राष्ट्राला संबोधित करताना, काकर यांनी पॅलेस्टिनींसोबत एकता आणि नवीन वर्षात संयम आणि नम्रतेचे आवाहन केले. पॅलेस्टाईनमधील गंभीर चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन आणि आमच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींशी एकता दाखवण्यासाठी सरकार नवीन वर्षासाठी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमावर कडक बंदी घालणार आहे.
माजी नौदल कर्मचाऱ्यांची फाशी अखेर टळली! कतार न्यायालयाने शिक्षा केली कमी
काळजीवाहू पंतप्रधान काकर म्हणाले की, इस्रायली सैन्याने २१,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले आहेत, ७ ऑक्टोबरपासून इस्रायली बॉम्बस्फोट सुरू झाल्यापासून हिंसाचार आणि अन्यायाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जवळपास ९,००० मुले मारली आहेत.
पंतप्रधान काकर म्हणाले की, गाझा आणि वेस्ट बँक येथे निष्पाप मुले आणि निशस्त्र पॅलेस्टिनी लोकांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण पाकिस्तान आणि मुस्लिम जग अत्यंत दुःखात आहे. पाकिस्तानने पॅलेस्टाईनला दोन मदत पॅकेज पाठवले आहेत तर तिसरे तयार केले जात आहे. पाकिस्तान पॅलेस्टाईनला वेळेवर मदत देण्यासाठी आणि गाझामधील जखमींना बाहेर काढण्यासाठी जॉर्डन आणि इजिप्तशी चर्चा करत आहे.
"इस्रायल आणि गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने पॅलेस्टिनी लोकांची परिस्थिती विविध जागतिक मंचांवर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही ते करत राहील, असे ककर म्हणाले. पाकिस्तानमध्ये नवीन वर्ष साजरे पारंपारिकपणे इस्लामिक गटांच्या प्रभावामुळे फार मोठे नसतात, जे बळाचा वापर करण्यासह विविध मार्गांनी उत्सव रोखण्याचा प्रयत्न करतात, असंही काकर म्हणाले.