पाकिस्तानला नाही मिळणार कोहिनूर..
By admin | Published: April 27, 2016 10:43 AM2016-04-27T10:43:40+5:302016-04-27T10:45:49+5:30
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील 'कोहिनूर हिरा' पाकिस्तानत परत आणणे शक्य नसल्याचे पंजाब प्रांत सरकराने लाहोर उच्च न्यायालयात स्पष्ट केले
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २७ - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील 'कोहिनूर हिरा' पाकिस्तानात परत आणणे शक्य नसल्याचे पंजाब प्रांत सरकारने मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात स्पष्ट केले. १८४९ साली लाहोर कराराअंतर्गत कोहिनूर हिरा ब्रिटनला देण्यात आल्याने हा हिरा परत आणणे शक्य नसल्याचे सरकारने नमूद केले. याच कोहिनूर हिऱ्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून भारत सरकारकडूनदेखील प्रयत्न सुरू आहेत.
'कोहिनूर हिरा' पाकिस्तानत परत आणण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले होते. १०५ कॅरेट्सचा हा हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग होता, त्या न्यायाने त्याची मालकी आता पाकिस्तानकडेच असली पाहिजे, असा युक्तिवाद जाफरी यांनी केला होता.
या मुद्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान पंजाब प्रांत सरकारने न्यायालयात हा हिरा परत आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. ' १८४९ साली महाराजा रणजित सिंग यांनी ईस्ट इंडिा कंपनीसोबत केलेल्या कराराअंतर्गत हा हिरा ब्रिटीशांकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा या हि-याची मालकी मिळवण्यासाठी ब्रिटन सरकारकडे मागणी करता येणार नसल्याचे' सरकारने स्पष्ट केले