पाकिस्तान नरेंद्र मोदींना देणार सार्क संमेलनाचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:08 PM2018-11-27T20:08:08+5:302018-11-27T20:10:28+5:30
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्याचा विचार पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
इस्लामाबाद - सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे गेल्या काहीवर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील चर्चाही थांबलेल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्याचा विचार पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
2016 मध्ये पाकिस्तानमध्ये सार्क संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासहीत सर्व देशांनी या संमेलनावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे यावेळच्या संमेलनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून औपचारिक निमंत्रण आल्यास त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Indian PM Narendra Modi to be invited to attend SAARC summit, says Pakistan Foreign Office: Dawn News pic.twitter.com/b0bj2MQDlB
— ANI (@ANI) November 27, 2018