“पाकिस्तानी सैन्य भारताशी युद्ध करण्यास सक्षम नाही, पाककडे ना पैसा ना टँकसाठी डिझेल”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 02:30 PM2023-04-25T14:30:45+5:302023-04-25T14:31:31+5:30
पाक लष्कर भारतीय लष्कराचा सामना करण्यास सक्षम नसल्याचं माजी लष्करप्रमुख बाजवांनी म्हटल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकारानं केलाय.
जेव्हा-जेव्हा पाकिस्तानी लष्कराची भारतीय लष्कराशी सामना झाला तेव्हा तेव्हा त्यांना तोडांवर पडावं लागलं असून पराभवही स्वीकारावा लागला होता. फाळणीनंतर पाकिस्तान कायमच भारताला धमकी देत आला आहे. परंतु आता पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर पडला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची सत्य कथन केलंय. तसंच पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना सामना करण्यास सक्षम नसल्याचं म्हटलंय.
पाकिस्तानात पुन्हा सत्तापालट होणार? माजी पंतप्रधान म्हणाले, “आम्ही संविधान ट्विस्ट केलं…”
पाकिस्तानमधील परिचित पत्रकार हामिद मीर यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील खुलासा केलाय. “बाजवांनी भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती,” असं त्यांनी सांगितलं. ब्रिटन स्थित पाकिस्तानी मीडिया युके ४४ ला मीर यांनी दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. भारताविरोधात लढण्यासाटी पाकिस्तानी लष्कराकडे ना तर दारुगोळा आहे ना टँकमध्ये भरण्यासाठी डिझेल असल्याचं बाजवांनी काही ज्येष्ठ पत्रकारांना सांगितल्याचं मीर म्हणाले.
टँकसाठी डिझेलच नाही
“कमांडर्सच्या मीटिंगमध्ये बाजवांनी सांगितलं होतं की पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना करू शकत नाही. टँकसाठी आमच्याकडे डिझेलही नाही,” असं बाजवा म्हणाले असल्याचं मीर यांनी नमूद केलं. बाजवा यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तसंच काश्मीर प्रकरणीही तोडगा शोधण्यावर ते काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
BIG: Pakistan Army Chief Qamar Javed Bajwa in 2021 had revealed to two senior Pakistani journalists about his secret talks with India’s NSA Ajit Doval and how Prime Minister Narendra Modi’s visit was being planned to Pakistan immediately after ceasefire was announced in 2021. Two… pic.twitter.com/mRbxR7AAJh
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 24, 2023
“बाजवांनी २०२१ मध्ये खुलासा केला होता की त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली होती. तसंच सिझफायरच्या घोषणेनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची योजना आखली होती. काश्मीरबाबतही बाजवांनी एक तोडगा काढला होता. त्याबाबत त्यांनी पाकिस्तानी जनतेला कधीही सांगितलं नाही,” असा दावा मीर यांनी केला.
इम्रान खान यांना माहिती नाही
सीझफायरच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचा दौरा करायचा होता. याबद्दल जेव्हा परराष्ट्र मंत्रालयाला माहिती मिळाले तेव्हा ते तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे गेले. परंतु त्यांना याची माहिती नव्हते. तेव्हा इम्रान खान यांनी अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची आपल्याला माहिती आहे, परंतु मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल माहिती नसल्याचं त्यांनी सांगितल्याचं मीर म्हणाले.