पाकिस्तानी प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला, नातेवाईकांनी पाठ धरताच, भारतात घुसला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:57 PM2024-08-27T17:57:51+5:302024-08-27T18:12:10+5:30

प्रेमात आणि युद्धात काय काय वेळ येते, हे एक पाकिस्तानी तरुणच सांगू शकेल अशी घटना घडली आहे. प्रेयसीचे नातेवाईक ...

Pakistani boyfriend goes to meet girlfriend, turns his back on relatives, sneaks into India... | पाकिस्तानी प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला, नातेवाईकांनी पाठ धरताच, भारतात घुसला...

पाकिस्तानी प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला, नातेवाईकांनी पाठ धरताच, भारतात घुसला...

प्रेमात आणि युद्धात काय काय वेळ येते, हे एक पाकिस्तानी तरुणच सांगू शकेल अशी घटना घडली आहे. प्रेयसीचे नातेवाईक हात धुवून मागे लागले म्हणून पळालेला प्रियकर कधी हद्द ओलांडून भारतात घुसला हे त्याचे त्यालाच कळले नाही. भारतीय हद्दीत येताच त्याला बीएसएफने ताब्यात घेतले आहे. 

२४ ऑगस्टच्या रात्री हा पाकिस्तानी तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या गावी पोहोचला होता. तिच्या घरच्यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी याचा पाठलाग सुरु केला. रात्रीच्या अंधारात त्याने सीमेवरील तारांचे कुंपण पार केले आणि भारतीय हद्दीत घुसला. पहाटे पावने तीनच्या सुमारास त्याला सीसीटीव्ही कॅमेरांनी कैद केले आहे. त्याच्याकडून दोन सीमचा एक मोबाईल फोन आणि एक डायरी मिळाली असल्याचे बाडमेरचे एसपी नरेंद्र सिंह मीना यांनी सांगितले आहे.

रात्रीच्या अंधारात पळाल्याने तो रस्ता भटकला आणि भारतीय हद्दीत १५ किमी आतपर्यंत झडपा गावात आला. सकाळी त्याला ग्रामस्थांनी पाहिले तेव्हा त्याने थारपारकरला जाण्यासाठी बस कुठे मिळेल असे विचारले. हे गाव पाकिस्तानात येते, यामुळे ग्रामस्थांनी त्याला बीएसएफच्या ताब्यात दिले आहे. 

या पाकिस्तानी तरुणाचे नाव परशुराम आहे. थारपारकर जिल्ह्यातील खारोडा गावात तो राहतो. हे गाव भारतीय हद्दीपासून ३५ किमी दूर आहे. तर सीमेपासून ७ किमीवर घोरामारी हे त्याच्या १७ वर्षांच्या प्रेयसीचे गाव आहे. तिथे त्याने तिला पळून जाण्यासाठी आग्रह धरला होता. परंतू तिने यास नकार दिला होता. एवढ्यात त्याच्यावर कुटुंबीयांची नजर पडली आणि मग पळापळ सुरु झाली. 

Web Title: Pakistani boyfriend goes to meet girlfriend, turns his back on relatives, sneaks into India...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.