'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:34 PM2024-05-15T15:34:14+5:302024-05-15T15:36:46+5:30
पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि भाजपाचे प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दरम्यान,
पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. 'नरेंद्र मोदी हे एक मजबूत नेते आहेत त्यांनी भारताला नवीन उंचीवर नेले आहे आणि ते नक्कीच देशाचे तिसरे पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी चांगले नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता पाकिस्तानला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगले पंतप्रधान तसेच भारतातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत असं बाल्टिमोरमधील पाकिस्तानी वंशाचे व्यापारी साजिद तरार म्हणाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे भाकीतही त्यांनी केले. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट देणारे आणि आपली राजकीय विश्वासार्हता पणाला लावणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. मला आशा आहे की मोदीजी पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील, असंही साजिद तरार म्हणाले.
Canada सरकारनं भारतीय कंपनीला ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड, का अडकली Infosys?
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. पाकव्याप्त काश्मीरसह (पीओके) देशाच्या अनेक भागात अशांतता निर्माण झाली आहे. साजिद तरारम्हणाले, "पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आयएमएफला कर वाढवायचे आहेत. विजेच्या किमती वाढल्या आहेत. आम्ही निर्यात करू शकत नाही. पीओकेमध्ये मुख्यत्वे आंदोलनामुळे वीज बिलात वाढ झाली आहे.
पीओकेमधील लोकांना आर्थिक मदत देण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या निर्णयावरही साजिद तरार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "पैसा कुठून आणणार? ते आयएमएफसोबत नवीन मदत पॅकेजवर चर्चा करत आहेत. पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. अशा वाईट काळात शाहबाज शरीफ यांचा हा निर्णय योग्य नाही, असंही साजिद तरार म्हणाले.
साजिद तरार म्हणाले, "खेदाची गोष्ट आहे की, पाकिस्तानमध्ये तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. निर्यात कशी वाढवायची? दहशतवादावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारायची, या मुद्द्यांवर चर्चा होऊन काम झाले पाहिजे. सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता आणि राजकीय अस्थिरता आहे. तरार म्हणाले, या सर्व समस्यांपासून दूर राहून पुढच्या स्तरावर नेणारे नेतृत्व मिळावे.