भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक समाधानी

By admin | Published: March 18, 2016 01:47 AM2016-03-18T01:47:19+5:302016-03-18T01:47:19+5:30

दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार, गरिबी आणि निरक्षरता अशा अनेक समस्यांनी वेढलेले असूनही पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आहेत.

Pakistani citizens are more satisfied than Indians | भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक समाधानी

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक समाधानी

Next

न्यूयॉर्क : दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार, गरिबी आणि निरक्षरता अशा अनेक समस्यांनी वेढलेले असूनही पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’च्या २०१५च्या अहवालामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दरडोई उत्पन्न, अपेक्षित आयुर्मर्यादा, सामाजिक आधार आणि जीवनाविषयीचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य या घटकांना समाधानाचे निदर्शक मानून आनंदी देशांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे. २०१५ च्या जागतिक अहवालातील आनंदी १५८ देशांच्या यादीत भारताचा ११७ वा क्रमांक लागतो. २०१३च्या तुलनेत भारताचे या यादीतील स्थान सहा अंकांनी घसरले आहे. तीन वर्षांपूर्वी भारत १११ व्या स्थानी होता. या यादीत पाकिस्तान ८१ व्या तर बांगलादेश १०९ व्या स्थानी आहे. याचाच अर्थ या दोन्ही देशांतील नागरिक भारतांतील नागरिकांहून अधिक समाधानी आहेत. रशियासमर्थक बंडखोरांसोबतच्या संघर्षात भरडला जात असलेला युक्रेन (१११ वे स्थान), इस्रायलसोबतच्या युद्धात होरपळून गेलेला पॅलेस्टाईन (१०८ वे स्थान) व इसिसकडे मोठा भूभाग गमवावा लागलेला इराक (११२ वा क्रमांक) या देशातील नागरिकही भारतीयांहून अधिक समाधानी आहेत. स्वीत्झर्लंड जगातील सर्वात आनंदी देश ठरला. पहिल्या पाच देशांत स्वीत्झर्लंडशिवाय आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे आणि कॅनडाचा समावेश आहे. आनंद, समाधान हे सामाजिक प्रगती व सार्वजनिक धोरणाचे उद्दिष्ट मोजण्याचे एकक मानले जाते, असे या अहवालात म्हटले आहे. आनंदी, समाधानी देशांच्या यादीत अमेरिका १५ व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)

तळाचे दहा देश
आनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान, सीरिया, टोगो, बुरुंडी, बेनिन, रवांडा, बुर्किना फासो, आयव्हरी कोस्ट, गुनिया आणि चाड या देशांचा तळाच्या दहा देशांत समावेश आहे.

Web Title: Pakistani citizens are more satisfied than Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.