विराटसाठी भारताचा झेंडा फडकावल्याने पाकिस्तानी चाहत्याला अटक

By Admin | Published: January 27, 2016 01:37 PM2016-01-27T13:37:07+5:302016-01-27T13:37:29+5:30

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीवरील प्रेमामुळे एका पाकिस्तानी चाहत्याने घरावर भारताचा झेंडा फडकावल्याने त्याला अटक करण्यात आली.

Pakistani flagged off India's flag for Virat | विराटसाठी भारताचा झेंडा फडकावल्याने पाकिस्तानी चाहत्याला अटक

विराटसाठी भारताचा झेंडा फडकावल्याने पाकिस्तानी चाहत्याला अटक

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
ओकारा (पाकिस्तान), दि. २७ - भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीवरील प्रेमामुळे एका पाकिस्तानी चाहत्याला तुरूंगात जावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रातातील ओकारा येथे राहणारा उमर दराज या तरूणाने घराच्या छतावर भारताचा तिरंगा फडकावल्याने मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र आपण भारतीय खेळाडू विराटचे फॅन आहोत आणि त्याच्यावरील प्रेमामुळे आपण हे कृत्य केल्याचे उमरने पोलिसांना सांगितले. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओकार येथील एका घराच्या छतावर भारताचा झेंडा फडकत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली असता पोलिसांनी त्या घरावर छापा टाकून उमर दराजला अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात देशाविरोधी कारवाया केल्याचे कलम लावून (एमपीओ-१६ व कलम १२३-ए) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांन उमरला स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली. 
मंगळवारी भारत- ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टी-२० सामन्यात विराटने शानदार फलंदाजी करत नाबाद ९० धावांची खेळी केल्याने भारताने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय गोलंदाजांवी ऑस्ट्रेलियाचे सर्व गडी १५१ धावांमध्ये बाद करत हा सामना ३७ धावांनी जिंकला. विराटच्या या खेळीच्या आनंदात उमरने घराच्या छतावर भारतीय झेंडा फडकावला, मात्र त्याला अटक करण्यात आली.  

Web Title: Pakistani flagged off India's flag for Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.