पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:58 PM2024-10-04T17:58:29+5:302024-10-04T17:59:32+5:30
या हिंदू विद्वानाचे नाव आहे मनोज चौहाण. ते पाकिस्तानात प्राध्यापक आहेत. यानंतर चौहाण यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आल्यानंतर झाकीर नाईकने इकडचे-तिकडचे बोलायला सुरुवात केली.
भारतातून पळून गेलेला झाकीर नाईक सध्या पाकिस्तानात आहे. यावेळी एका हिंदू विद्वानाने अथवा स्कॉलरने झाकीर नाईकला कट्टरतावादासंदर्भात आरसा दाखवला आहे. अगदी झाकीर नाईकसोबत व्यासपीठावर संस्कृत श्लोक म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यानंतर भगवत गीतेचा उल्लेख करत त्यांनी इस्लाम स्कॉलर झाकीर नाइकला प्रश्न केला. या हिंदू विद्वानाचे नाव आहे मनोज चौहाण. ते पाकिस्तानात प्राध्यापक आहेत. यानंतर चौहाण यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आल्यानंतर झाकीर नाईकने इकडचे-तिकडचे बोलायला सुरुवात केली.
भागवत गीतेचा केला उल्लेख -
प्रोफेसर चौहान म्हणाले, "भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटले आहे की, हे मानवा समाज तुझी कर्मभूमी आणि तुझे कर्माने मोजमापा होईल. तू कर्मापासून पळ काढू नकोस. तुझे कर्मच तुझे कर्तव्य आहे आणि तुझे कर्तव्यच तुझा धर्म आहे. मात्र हा धर्म केवळ तुझ्या हितासाठी आहे. यामुळे तू आप्तांपासून मुक्त होऊन समाजासाटी काम करत. तोच मोक्षाचा मार्ग आहे."
झाकिर नाईकला विचारला असा प्रश्न -
यानंतर प्रोफेसर मनोज चौहाण यांनी झाकीर नाईकला प्रश्न विचारला. चौहाण म्हणाले, "संपूर्ण जगात, भूमध्यसागरीय देशांतही धर्माच्या नावावर लोकांना मारले जात आहे. याळे धर्माची बदनामी होत आहे. माझा प्रश्न आहे की, पाकिस्तानसह जगात असे अनेक देश आहेत, जे धर्माच्या नावावर फूट पाडत आहेत, हे थांबवण्यासाठी आपण काय करायला हवे?
Hindu scholar in Pakistan showing mirror to Islamist radical hate preacher Zakir Naik. pic.twitter.com/exvcwlYgqh
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) October 4, 2024
यानंतर झाकीर नाईक उत्तर देण्यासाठी उभा राहिला असता थेट बोलण्याऐवजी इकडचे-तिकडचे बोलू लागला. संबंधित प्रश्नाचा पुनरुच्चार करत झाकीर म्हणाला, भाऊसाहेबांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की, धर्माच्या नावावर भांडणं का होतात आणि त्यावर उपाय काय? तर 'माझ्याकडे कुराणातील एक आयत आहे, ज्याला मी मास्टर की म्हणतो.' नाईक पुढे म्हणाला, यात म्हटले आहे की, "चला आपण अशा गोष्टींकडे चलू यात, जे आपल्यात एक समान आहे."