Aryan Khan: “आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केलं जातंय”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:10 PM2021-10-19T17:10:31+5:302021-10-19T17:11:51+5:30

Aryan Khan: पाकिस्ताननेही या प्रकरणात उडी घेतली असून, आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केले जात आहे, असे म्हटले आहे. 

pakistani media claims in aryan khan drug arrest case whether govt trying to target shahrukh khan | Aryan Khan: “आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केलं जातंय”

Aryan Khan: “आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केलं जातंय”

googlenewsNext

इस्लामाबाद: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan)  ड्रग्स पार्टीप्रकरणी (Cruise Drugs Party Case) अटक करण्यात आली आहे. आताच्या घडीला आर्यन आर्थर रोड तुरुंगात असून, त्याला सर्व सामान्य कैद्यांप्रमाणे राहावे लागत आहे. या प्रकरणी अद्यापही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. विविध स्तरांतील मंडळींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता पाकिस्ताननेही या प्रकरणात उडी घेतली असून, आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केले जात आहे, असे म्हटले आहे. 

पाकिस्तानमधील आघाडीच्या एक्स्प्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. याचे शीर्षकच असे आहे की, आर्यन खानला अटक करून भारतातील सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय का? या लेखात शाहरूख खानची स्तुती करण्यात आली आहे. शाहरुख खान सर्वांत मोठा स्टार असून, तो त्याचा चार्म, अॅटिट्यूड, मदतीसाठी ओळखला जातो, असे म्हटले आहे. 

आर्यन खानच्या सहभागामुळेच प्रकरण वाढवलेय

आर्यन खान हा बिग स्टार शाहरुख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण अधिक वाढवण्यात आले आहे. अनेक लोक ज्याप्रमाणे चर्चा करत आहे, त्याप्रमाणे भारतात मुस्लिमांशी व्यवहार करताना भेदभाव केला जात आहे. बॉलिवूड भारतातील सर्वांत मोठी इंडस्ट्री असली, मोठे सुपरस्टार असले, तरी अनेक अडचणींचा सामना तेथे करावा लागतो, असे या लेखात म्हटले आहे. याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, स्वरा भास्कर, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती, नवाब मलिक यांच्या वक्तव्यांचा आधार घेतला आहे. तसेच लखीमपूर खेरी घटनेचा उल्लेख करत आर्यन खान मुस्लीम सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा असल्यामुळे वाढवून गोष्टी केल्या जात आहेत, असा दावा ट्रिब्युनमधील लेखात करण्यात आला आहे. 

दरम्यान, आर्यन खानचा क्वारंटाइन कालावधी संपल्यामुळे त्याला अन्य कैद्यांसोबत राहावे लागत आहे. आर्थर रोड कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला अन्य कैद्याप्रमाणेच तुरुंगातील जेवण देण्यात येते. अन्य कैद्यांप्रमाणे तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास आर्यनला सक्त मनाई आहे. अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे. आर्यनला बाहेरील पदार्थ खाण्यास मनाई असली, तरी घरातील कपडे परिधान करण्याची मुभा आर्यनला देण्यात आली आहे. आर्यन तुरुंगात जेवण देण्यात येत असले तरीदेखील तो येथील कँटीनमधून काही पदार्थ खरेदी करतो. यात शक्यतो तो पाण्याची बाटली, बिस्कीटचे पुडे आणि स्नॅक्सची काही पाकिट खरेदी करत असल्याचे सांगण्यात येते. तसेच आर्यन खान तुरुंगातील जेवण घेण्यापेक्षा पाण्यात बिस्किटे बुडवून खातो, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: pakistani media claims in aryan khan drug arrest case whether govt trying to target shahrukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.