पाकिस्तानी मंत्र्याने कात्रीऐवजी चक्क दातानेच कापली उद्घाटनाची रिबीन, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:19 PM2021-09-02T19:19:13+5:302021-09-02T19:29:56+5:30
Pakistani minister Fayaz Ul Hassan Chohan: यापूर्वी याच मंत्र्यांनी 2019 मध्ये हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
इस्लामाबाद:पाकिस्तानातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही मजेशीर तर काही विचित्र व्हिडिओदेखली असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाकिस्तानचे पाकिस्तानातील मंत्री फयाज उल हसन चौहान यांचा आहे. एका दुकानाच्या उद्घाटनासाठी फयाज हसन चौहान आले होते.
Me opening ketchup sachet with scissors right in front of me. pic.twitter.com/JVQ0Cbm9vq
— Naila Inayat (@nailainayat) September 2, 2021
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे वादग्रस्त मंत्री फयाज उल हसन चौहान यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. रिपोर्टनुसार, फैयाज उल हसन चौहान लाहोरमध्ये एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. दुकान मालकाने उद्घाटनासाठी एक रिबीन लावली होती, पण मंत्र्यांना कात्रीनं ती रिबीन कापता आली नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एखाद्या कात्रीनं रिबीन कापण्याऐवजी चक्क दातानेच ती रिबीन कापली.
आजही संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे आणि हा विषाणू जगातून संपण्याऐवजी अधिकच घातक होताना दिसत आहे...#coronavirus#muvariant#WHOhttps://t.co/49Vcmn7fhX
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
पाकिस्तानचे वादग्रस्त मंत्री
फयाज-उल-हसन चौहान तेच मंत्री आहेत, ज्यांनी 2019 मध्ये हिंदूंबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना माहिती आणि संस्कृती मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण, नंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षानं त्यांना माफ करुन तुरुंग मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आता या उद्घाटनाच्या व्हिडिओनंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत.