पाकिस्तानी मंत्री हॉटेलमध्ये जेवायला गेले, लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 09:28 PM2022-07-15T21:28:24+5:302022-07-15T21:28:48+5:30
Pakistan: एकीकडे इम्रान खान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला नेहमी चोर सरकार म्हणतात. दुसरीकडे पाकिस्तानी जनता शरीफ सरकारमधील मंत्र्यांना चोर म्हणत आहे.
Pakistan:इम्रान खान भलेही पाकिस्तानचे पंतप्रधान नाहीत, पण पाकिस्तानच्या जनतेवरील त्यांची पकज कमजोर झालेली नाही. अजूनही समर्थक इम्रान खान यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सत्ता जाण्यामागे परदेशी ताकत असल्याचा दावा करत इम्रान खान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला चोर सरकार म्हणतात. दरम्यान, शरीफ सरकारमधील मंत्री एहसान इक्बाल यांना तर चक्क जनतेनेच चोर घोषित केले.
After watching federal Minister Ahsan Iqbal at McDonalds, people started chanting 'Chor, Chor'.....
— PTI Rwp Official (@PTIOfficialRWP) July 8, 2022
These crooks have left no respect from public. #چور_کا_عوامی_احتساب#PunjabKaptaanKapic.twitter.com/6Ur9cQSyhh
मिळालेल्या माहतीनुसार, एहसान इक्बाल एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेले होते, यावेळी एका कुटुंबाने त्यांच्यासोबत हुज्जत घातली आणि सर्वांसमोर मोठ-मोठ्याने चोर-चोर अशा घोषणा सुरू केल्या. पाकिस्तानच्या समा वाहिनीच्या म्हणण्यानुसार, एहसान इक्बाल इस्लामाबाद-लाहोर हायवेवर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. या घटनेनंतर एहसान यांनी ट्वीट करत या कुटुंबावर असभ्य असल्याचा ठपका ठेवला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
पीटीआय नेत्याने शेअर केला व्हिडिओ
पाकिस्तान मीडियानुसार, हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे झेलमचे जिल्हा महासचिव फराज चौधरीने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत लिहीले की, 'न्यायालयाने एहसान इक्बालसारख्या लोकांच्या बाजुने काय निकाल दिला महत्वाचा नाही, लोक चौका-चौकात यांना उत्तर देत आहेत.'