पाकिस्तानीचा दुबईत ‘पोपट’, बुर्ज खलिफावर झेंडा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:33 AM2023-08-15T05:33:25+5:302023-08-15T05:36:09+5:30
पाकिस्तानी लोकांचा पोपट झाला, ‘प्रँकचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला’; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, नेमके प्रकरण काय?
पाकिस्तानी नागरिकांचा एक मोठा गट दुबईतील बुर्ज खलिफाजवळ निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (१४ ऑगस्ट) आपल्या देशाचा झेंडा फडकेल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला.
बुर्ज खलिफाजवळ रात्री शेकडो पाकिस्तानी लोक जमले होते. तथापि, घड्याळात १२ वाजल्यानंतरही इमारतीवर पाकचा राष्ट्रध्वज झळकला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या लोकांचा जमाव पाकिस्तानच्या घोषणा देऊ लागला. एका पाकिस्तानी महिलेनेच ही सर्व घटना मोबाईलवर कैद केली. ‘रात्रीचे १२ वाजून १ मिनिट झालेत, पण बुर्ज खलिफावर पाकचा राष्ट्रध्वज झळकणार नाही असे दुबईच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे. हीच औकात राहिलीये आता आपली’ असे ती म्हणते.
बुर्ज खलिफावर गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकचा राष्ट्रध्वज झळकला होता. त्यामुळे यंदाही आपला झेंडा झळकेल या आशेने लोक येथे जमले होते. पण आता, पाकिस्तानी लोकांचा पोपट झाला, ‘प्रँकचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला’, अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.