Pakistan: तालिबानने पाकिस्तानला आणखी भिकेला लावले; रुपया जोरात आपटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 14:50 IST2021-09-16T14:44:34+5:302021-09-16T14:50:36+5:30
Taliban power Pakistan Loss: पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज फेडण्यास पाकिस्तानला जमलेले नाही. तसेच सौदी अरेबियासह अन्य देशांचे देखील पाकिस्तान देणे आहे.

Pakistan: तालिबानने पाकिस्तानला आणखी भिकेला लावले; रुपया जोरात आपटला
अफगाणिस्तानमध्येतालिबान राज येण्यासाठी पाकिस्तानने मोठे कारस्थान रचले होते. अमेरिकेचा पैसा, शस्त्रे पाकिस्ताननेतालिबानींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरली होती. परंतू आता अफगाणिस्तानमध्ये आलेल्या तालिबानमुळे आधीच कंगाल झालेला पाकिस्तान भिकेला लागला आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज फेडण्यास पाकिस्तानला जमलेले नाही. तसेच सौदी अरेबियासह अन्य देशांचे देखील पाकिस्तान देणे आहे. त्यातच पाकिस्तानने त्याला अमेरिका, युएनकडून मिळालेली मदत ही भारताविरोधात दहशतवादी कारवायांवर वापरली. तसेच तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरली. यामुळे पाकिस्तानच्या हाती आता छदामही राहिलेला नाही.
चलन बाजारात पाकिस्तानी रुपयामध्ये मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया हा 169.9 एवढ्या ऐतिहासिक स्तरावर कोसळला आहे. 14 मे पासून या पाकिस्तानी रुपयामध्ये 18 रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारीदेखील हा रुपया 169 च्या खालीच होता.
Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
अवघ्या आशियाभरात पाकिस्तानी रुपयाची नाचक्की झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तालिबानची अफगाणिस्तानमध्ये आलेली सत्ता म्हटले जात आहे. याला अंतर्गत कारणेही जबाबदार आहेत. Alpha Beta कोरचे एक्सपर्ट खुर्रम शहजाद यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमुळे पाकिस्तानी रुपयावर मोठा दबाव आहे. अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तान सोडले तेव्हापासून रुपयावर दबाव सुरु झाला आहे.
ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा व्यापारी तोटा 133 टक्क्यांनी वाढून 4.05 अब्ज डॉलरवर गेला आहे. State Bank of Pakistan ने देखील यावर काहीही पाऊल उचललेले नाही.