फॉली यांच्या बदल्यात हवी होती पाकिस्तानी शास्त्रज्ञाची सुटका
By admin | Published: August 23, 2014 02:05 AM2014-08-23T02:05:12+5:302014-08-23T02:05:12+5:30
पाकिस्तानी महिला शास्त्रज्ञासह तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची सुटका करण्याची मागणी ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेने केली होती
Next
वॉशिंग्टन : अमेरिकी पत्रकार जेम्स फॉली यांच्या सुटकेच्या मोबदल्यात पाकिस्तानी महिला शास्त्रज्ञासह तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची सुटका करण्याची मागणी ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेने केली होती. तथापि, अमेरिकेने पत्रकार फॉली यांच्या सुटकेसाठी आम्ही दिलेले अनेक प्रस्ताव फेटाळून लावले, असा दावाही ‘आयएसआयएस’ या संघटनेने फॉली यांच्या कुटुंबियांना 12 ऑगस्ट रोजी पाठविलेल्या ई-मेलमध्ये केला आहे.
ग्लोबल पोस्टने जारी केलेल्या या ई-मेलमध्ये या संघटनेने म्हटले आहे की, अमेरिकी लोकांच्या सुटकेसाठी रोख व्यवहारामार्फत समझोता करण्याच्या अनेक संधी दिल्या. अमेरिकेतील तुरुंगात डांबण्यात आलेल्या डॉ. आफिया सिद्दीकी यांच्यासह इतर मुस्लिमांच्या सुटकेच्या मोबदल्यात आम्ही आमच्या ताब्यातील अमेरिकी नागरिकांची सुटका करण्याचाही प्रस्ताव दिला होता; परंतु आमचे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले. त्यातून आपल्या नागरिकांची सुटका करण्याची अमेरिकेची इच्छा नव्हती, हे सिद्ध झाले. इस्लामिक स्टेटने अलीकडेच एक व्हिडिओ जारी करून आयएसआयएसचा एक सदस्य पत्रकार फॉली यांचा शिरच्छेद करताना दाखविले होते.
2क्12 मध्ये फॉली यांचे सिरियात अपहरण करण्यात आले होते. फॉली यांच्या कुटुंबियांच्या सहमतीअंती हा ई-मेल प्रकाशित करण्यात आल्याचे ग्लोबल पोस्टने म्हटले आहे. तथापि, यात अनेक विसंगती आहेत.
उदाहरणार्थ फॉली यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांना संधीच देण्यात आली नाही.(वृत्तसंस्था)
4जगभरातील मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी निर्दयी कृत्याबद्दल आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा तीव्र निषेध करीत या संघटनेचे कृत्य इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे. यात अमेरिकेतील कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स, इस्लामिक सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका, ऑर्गनायङोशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन, द मुस्लिम पब्लिक अफेयर्स कौन्सिल या मान्यवर संघटनांचा यात समावेश आहे.
4डॉ. आफिया सिद्दीकी न्यूरो शास्त्रज्ञ आहेत. 2क्क्8 मध्ये अफगाणिस्तानात त्यांना अटक करण्यात आली होती. रासायनिक शस्त्रे, डर्टी बॉम्ब आणि विषाणूंशी संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे आढळून आली होती. या कागदपत्रतून त्यांचा अमेरिकेविरुद्ध घातपात करण्याचा बेत असल्याचे संकेत मिळत असल्याचे सांगत अमेरिकेने दहशतवादाच्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती. नंतर अमेरिकेच्या एका कोर्टाने त्यांना 86 वर्षाचा तुरुंगवास सुनावला होता.
4पत्रकार जेम्स फॉली यांच्या सुटकेसाठी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने 13 कोटी डॉलरची खंडणी मागितली होती, अशी माहिती ‘ग्लोबल पोस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलीप बालबोनो यांनी दिली. नोव्हेंबर 2क्12 मध्ये फॉली यांचे अपहरण करण्यात आले होते.