'हिप्नोटाइज' करतोय निळ्या डोळ्यांचा पाकिस्तानी चहावाला

By admin | Published: October 19, 2016 03:20 PM2016-10-19T15:20:42+5:302016-10-19T15:44:02+5:30

पाकिस्तानमधील निळ्या डोळ्यांचा एक चहावाला सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.निळ्या डोळ्यांनी तो तरुणींना भुरळ घालतो आहे

The Pakistani teasers of blue eyes that are 'hinplateizing' | 'हिप्नोटाइज' करतोय निळ्या डोळ्यांचा पाकिस्तानी चहावाला

'हिप्नोटाइज' करतोय निळ्या डोळ्यांचा पाकिस्तानी चहावाला

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 19 - पाकिस्तानमधील निळ्या डोळ्यांचा एक चहावाला सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरणा-या या चहावाल्याचे नाव 'अरशद खान', असून तो केवळ 18 वर्षांचा आहे. अरशदचा व्हायरल झालेला हा फोटो पाहून तो एक 'चहावाला' आहे, यावर कुणाचाच विश्वासच बसत नाही. अरशदच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांनी पाकिस्तानीच नव्हे तर भारतीय तरुणींवरही मोहिनी घातली आहे. या पाकिस्तानी चहावाल्याच्या फोटोकडे पाहून सध्या सर्व तरुणींच्या तोंडून 'ब्लू आईज हिप्नोटाइज तेरी करदी ऐ मेनू' हे गाणे आपोआप गायले जात आहे. 
 
तेथील स्थानिक फोटोग्राफरने अरशदचा फोटो काढून सोशल मीडिया इन्टाग्रामवर शेअर केला. यानंतर या फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. पाकिस्तानमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर तर  #chaiwala असा ट्रेंडही सुरू आहे. तसंच त्याची तुलना बॉलिवूडमधील अभिनेत्यांसोबतही केली जात आहे. हा चहावाला कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. 
 
विशेष म्हणजे, अरशदच्या निळ्या डोळ्यांनी तरुणींना अक्षरशः वेड लावले आहे. त्याला प्रत्यक्षात पाहण्यासाठी काही जण इस्लामाबादला जात आहेत. इस्लामाबादमधील 'इतवार बाजार'मध्ये अरशदचे स्वतःचे चहाचे दुकान आहे. 'लोक मला भेटण्यासाठी येतात, माझ्यासोबत फोटो काढतात, यासाठी खूप खूश आहे. मात्र यामुळे माझ्या कामावरदेखील परिणाम होतो आहे', असे अरशदने म्हटले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणा-या या पाकिस्तानी चहावाल्याला सध्या मॉडेलिंगच्या ऑफर्सही येत असल्याची माहिती समोर आली आहे. 
 

Web Title: The Pakistani teasers of blue eyes that are 'hinplateizing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.