आत्मघातकी हल्ल्यात पाकचे ११ सैनिक ठार, १३ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:40 AM2018-02-05T01:40:14+5:302018-02-05T01:40:32+5:30
पाकिस्तानच्या स्वात खो-यामध्ये लष्करी तळावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात ११ जवान ठार झाले, तर १३ जखमी झाले.
पेशावर : पाकिस्तानच्या स्वात खो-यामध्ये लष्करी तळावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात ११ जवान ठार झाले, तर १३ जखमी झाले. कबाल येथे असलेल्या लष्करी कॅम्पवर जवान व्हॉलीबॉल खेळत असताना एका तरुणाने आत्मघातकी हल्ला केला. पाकिस्तानी लष्करावर २०१३ नंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
अंगावर स्फोटके लपेटून एका तरुणाने लष्कराच्या तळामध्ये घुसखोरी करून प्रवेश मिळवला. जवान खेळत असताना त्याने स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात ११ जण जागीच ठार झाले. त्यात लष्कराच्या कॅप्टनचा समावेश आहे. जखमी झालेल्या १३ जवानांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
हल्ल्याचे वृत्त प्रसारित होताच तहरिक-ए-तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरासानी याने हे आम्ही केल्याचे जाहीर केले. त्या तरुणाला आपण लष्करी तळावर हल्ल्यासाठी धाडले होते, असे तो म्हणाला. तालिबानने २०१३ मध्ये धार्मिक स्थळावर केलेल्या अतिरेकी हल्ल्यात २१ जण ठार आणि ७० जखमी
झाले होते.
नेत्याला केले ठार
जमात-ए-इस्लामी पक्षाच्या मलिक तुफई या नेत्याची रविवारी एका अज्ञात इसमाने गोळी घालून हत्या केली. खैबर पख्तुनवाला प्रांतात दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने मलिक यांच्यावर गोळ््या घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात मलिक यांचे जागीच निधन झाले. (वृत्तसंस्था)
>अभिनेत्रीची हत्या
खासगी कार्यक्रमात भाग घेण्यास नकार दिल्याने पाकिस्तानातील पश्तुनी नाट्य अभिनेत्री सुंबुलची शनिवारी तीन जणांनी घरात घुसून हत्या केली. तिन्ही हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्लेखोरापैकी एकाचे नाव नईम आहे. तो पूर्वी पोलीस खात्यात काम करीत होता.
दुसºयाचे नाव जहांगीर असून, दिवंगत गायिका गझला जावेदशी त्याचे लग्न झाले होते. गझला जावेद व तिच्या वडिलांच्या खूनाच्या आरोपाखाली जहांगीरला फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु गझला कुटुंबीयांशी तडजोड झाल्यानंतर जहांगीर याला दोषमुक्त केले होते.