बॉलिंग अॅक्शनमुळे पाकिस्तानचा 7 वर्षाचा मुलगा चर्चेत
By admin | Published: June 3, 2016 10:03 AM2016-06-03T10:03:53+5:302016-06-03T10:03:53+5:30
पाकिस्तानमध्ये सध्या 7 वर्षाचा एहसान त्याच्या बॉलिंग अॅक्शनमुळे चर्चेचा विषय बनला आहे. एवढया कमी वयात एहसानने बॉलिंग अॅक्शनवर आपली पकड बनवली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. 03 - क्रिकेट जगतात पाकिस्तानला जर कोणी सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवून दिली असेल तर ती त्यांच्या गोलंदाजांनी. पाकिस्तानने क्रिकेट जगाला एकापेक्षा एक सरस गोलंदाज दिले आहेत. सरफराज नवाज, इमरान खान, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर आणि मोहम्मद आमीर यांच्यासारखे सर्वश्रेष्ठ गोलंदाज पाकिस्तानला मिळाले. ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचा स्थर उंचावला.
मात्र पाकिस्तानमध्ये सध्या 7 वर्षाचा एहसान त्याच्या बॉलिंग अॅक्शनमुळे चर्चेचा विषय बनला आहे. एवढया कमी वयात एहसानने बॉलिंग अॅक्शनवर आपली पकड बनवली आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कप्तान सना मीर एहसानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एहसानचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एहसानची बॉलिंग अॅक्शन पाहायला मिळते.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलने हा व्हिडिओ रिट्विट करत एहसानवर मेहनत घेतल्यास तो एक दिवस पाकिस्तानसाठी नक्की खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एहसानला व्यवस्थित कोचिंग मिळाल्यास पाकिस्तानला क्रिकेटला येत्या काही वर्षात अजून एक तोडीचा फास्ट बॉलर मिळेल हे मात्र नक्की.
#RawTalent of #Pakistan, Ehsan Ullah ,who is just 7 years old, possessing an impressive bowling action.Great talent pic.twitter.com/xuNPfnDUWa
— Sana Mir (@mir_sana05) June 2, 2016