पाकिस्तानमध्ये 'कोंबडी घोटाळा'?; सरकारकडून कोंबडी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:33 PM2019-01-24T12:33:06+5:302019-01-24T12:34:13+5:30
देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारने नागरिकांना कोबंड्या वाटण्याची योजना सुरू केली आहे.
लाहौर - पंतप्रधान इम्रान खान यांच्या पोल्ट्री फार्मिंग योजनेनुसार लोकांना कोंबड्या वाटण्यात येत आहेत. खान यांच्या मंत्रालयाकडून या कोंबड्यांना त्यांच्या नवीन मालकांकडे सोपविण्यात येत आहे. लाहोरच्या खाना येथेही कोंबड्या वाटप करण्यात येत आहेत. मात्र, या कोंबड्या वाटण्यातही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पाकिस्तानमधीलइम्रान खान यांच्या सरकारने नागरिकांना कोबंड्या वाटण्याची योजना सुरू केली आहे. पोल्ट्री फार्मिंग योजना असं या योजनेचं नाव असून इम्रान यांच्या पोल्ट्री फार्ममधून सरकारी अधिकाऱ्यांमार्फत या कोंबड्या देण्यात येत आहेत. इम्रान खान यांच्या या योजनेचं लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तर, काही लोकांनी या कोंबड्या वाटपात घोळ असल्याचा आरोप केला आहे. केवळ, अधिकाऱ्यांच्या नातेवाईक आणि जवळीक असलेल्यांनाच या कोंबड्या देण्यात येत असल्याचा आरोप लाहोर येथील नागरिकांनी केला आहे. तर काही कोंबड्या व्यापाऱ्यांनी खान सरकारच्या या योजनेवरच टीका केली आहे. इम्रान खानच्या कोंबड्या काय 6-6 अंडे देतात का, इम्रान खानचे सरकार नीट काम करत नाही, असे येथील पोल्ट्री फार्म आणि कोंबड्या विकणारे व्यापारी म्हणत आहेत. दरम्यान, खान यांच्या मंत्रालयाने कोबंडे देण्याचीही योजना सुरू केली आहे. त्यानुसार, एका व्यक्तीला 10 कोंबडे देण्यात येणार आहेत.