एका भारतीय जवानाला पकडल्याचा पाकचा दावा
By admin | Published: September 29, 2016 11:17 PM2016-09-29T23:17:43+5:302016-09-29T23:31:18+5:30
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौव्हाण (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 29 : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौहान (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे. तर आठ जवानांना मारल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. सैन्य दलाच्या सूत्रांच्या हवाल्याने डॉनने याबाबत वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, भारतीय सैन्य नियंत्रण रेषा पार करुन आल्यानंतर त्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पकडण्यात आलेल्या भारताच्या त्या जवानाचे नाव चंदू बाबूलाल चौहान असे आहे. या जवानाला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. तर मृत जवानांचे मृतदेह अद्याप नियंत्रण रेषेजवळ भारताने ताब्यात घेतले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याचा हा गोळीबार पहाटे २.३० ते सकाळी ८ पर्यंत सुरु होता. भिंबर, केल, लिपा या भागात हा गोळीबार सुरु होता. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.