पाकिस्तानची गणती उत्पाती देशांत

By Admin | Published: March 15, 2015 01:51 AM2015-03-15T01:51:14+5:302015-03-15T01:51:14+5:30

अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेने जागतिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या देशांत पाकचीही गणती केली आहे.

Pakistan's Cognitive Countries | पाकिस्तानची गणती उत्पाती देशांत

पाकिस्तानची गणती उत्पाती देशांत

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेने जागतिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या देशांत पाकचीही गणती केली आहे. पाकसह इराक, सिरिया व उत्तर कोरियासारखे देश अमेरिकेपुढे रणनीतीदृष्ट्या आव्हान निर्माण करू शकतात, असेही सीआयएने स्पष्ट केले आहे.
इराक, सिरिया, येमेन, लिबिया, अफगान आणि पाक यासारख्या देशांत केव्हाही उत्पात व हिंसाचार भडकू शकतो. हे देश आमच्या पुढे सातत्याने रणनीतीदृष्ट्या आव्हान निर्माण करतात. या देशांतील घडामोडींवर लक्ष ठेवण्याऐवजी आमचे विश्लेषक जागतिक स्थैर्याच्या दृष्टीने कसा कल आहे, यावर लक्ष ठेवून आहेत, असे सीआयएचे संचालक जॉन ब्रेनान यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेशावरमधील एका शाळेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेखही ब्रेनान यांनी केला.
निरागस शाळकरी मुलांवर गोळ्या झाडून दहशतवाद्यांनी केलेले क्रौर्य अत्यंत धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले. अशा प्रकारच्या हल्ल्यातून अस्वस्थ प्रवृत्ती दिसते. अशा प्रवृत्तीवर आम्ही गेल्या काही वर्षांपासून नजर ठेवून आहोत.
दहशतवादी हल्ल्यांचा धोका विकेंद्रित होत आहे. त्यावर नजर ठेवणे आणि अशा प्रवृत्तींचा बीमोड करणे कठीण काम आहे. गेल्या काही वर्षांपासून अस्थिरता वाढत आहे, असेही ब्रेनान म्हणाले. ते विदेशी संबंध परिषदेत (कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्स) बोलत होते. (वृत्तसंस्था)

४अस्थिरता वाढल्याने अशांत टापूंची संख्या वाढेल. तसेच मानवी संकट आणि सीमावर्ती भागात निर्वासितांची संख्या वाढेल. शस्त्रास्त्र आणि लढवय्यांची संख्या वाढेल. सोबतच अशांती व हिंसाचारामुळे लोकशाही मूल्यांऐवजी सुरक्षेवर अधिक भर द्यावा लागेल. सीआयए या आव्हानांचा मुकाबला करीत आहे. जगभरातील गुप्तचर संस्थांशी आमचे संबंध आहेत. अन्य देशांतील गुप्तचर संस्थांशीही संबंध प्रस्थापित करावे लागतील, असेही जॉन ब्रेनान म्हणाले.

Web Title: Pakistan's Cognitive Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.