पाकिस्तानकडून क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

By Admin | Published: January 20, 2016 01:51 AM2016-01-20T01:51:35+5:302016-01-20T01:51:35+5:30

पाकिस्तानकडून क्रूझ

Pakistan's cruise missile test | पाकिस्तानकडून क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

पाकिस्तानकडून क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

googlenewsNext
किस्तानकडून क्रूझ
क्षेपणास्त्राची चाचणी
...........
इस्लामाबाद : पाकिस्तानने मंगळवारी क्रूझ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरून आणि जहाजावरून हे मिसाईल ३५० कि.मी. पर्यंत मारा करू शकते. हत्फ आठ असे या मिसाईलचे नाव आहे.
आजची चाचणी यशस्वी झाल्याचे वृत्त डॉनने दिले आहे. यात म्हटले आहे की, हे मिसाईल अति वेगाने मारा करू शकते. जहाज, कमांडो बंकर्स, मोठे पूल आणि जल प्रकल्प यांना हे मिसाईल लक्ष्य करू शकते. पाच मीटर लांब असलेल्या या क्षेपणास्त्राचे वजन एक हजार किलो आहे. जगातील निवडक देशांकडेच हे क्षेपणास्त्र आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचे अभिनंदन केले आहे.
.........

Web Title: Pakistan's cruise missile test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.