अफगाण भूमीवरही पाकच्या कुरापती
By admin | Published: July 24, 2016 02:23 AM2016-07-24T02:23:54+5:302016-07-24T02:23:54+5:30
पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद आणि अल-कायदा यासारख्या अतिरेकी संघटना अफगाणिस्तानात भारतीय हितसंबंध आणि उद्दिष्टांना लक्ष्य करीत
संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद आणि अल-कायदा यासारख्या अतिरेकी संघटना अफगाणिस्तानात भारतीय हितसंबंध आणि उद्दिष्टांना लक्ष्य करीत आहेत, असे प्रतिपादन अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मेहमूद सैकल यांनी केले आहे.
दहशतवादविरोधी समितीच्या वतीने ‘विदेशी दहशतवाद’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या खुल्या ब्रिफिंगमध्ये सैकल यांनी ही माहिती दिली. त्यांनी समितीला सांगितले की, अफगाणिस्तानात प्रादेशिक दहशतवादी गटांनी तालिबानी गटांसोबत हातमिळवणी केली आहे. हे इस्लामी गट अफगाणिस्तानच्या सुरक्षेला तसेच स्थैर्याला राजनैतिक धोका निर्माण करीत आहेत.
त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानात ६,१00 गनिम आहेत. त्यातील बहुतांश गनिम पूर्व आणि इशान्य अफगाणिस्तानात कार्यरत आहेत. त्यातील १,८00 ते २,000 गनिमांच्या निष्ठा आयएसआयएसशी जोडलेल्या आहेत. पाकिस्तान सरकारमधील काही गट या क्षेत्रातील दहशतवादी समूहांना मदत करीत आहेत. (वृत्तसंस्था)
इस्लामिक आमिरात आॅफ अफगाणिस्तानचे पुनरुज्जीवन करणे, अफगाणमधील भारताचे हित आणि लक्ष्य यांना नुकसान पोहोचविणे व जगातील सक्रिय आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाळ्यासोबत रणनीतिक आघाडी बनविणे, असे या अतिरेक्यांचा उद्देश आहे.