पाकिस्तानची 'लोकशाही'; 29 पंतप्रधानांपैकी एकानेही कार्यकाळ पूर्ण केला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 01:17 PM2018-07-26T13:17:08+5:302018-07-26T13:23:34+5:30
पाकिस्तानात राजकीय स्थैर्य फारकाळ टिकले नाही. प्रचाराच्यावेळेस माजी पंतप्रधानांचा बॉम्बस्फोटात खून होणे, पदावरती असलेल्या पंतप्रधानांची हत्या होणे, माजी पंतप्रधानांना फाशी होणे, एखाद्या राजकीय नेत्याचा विमान अपघातात संशयास्पद स्थितीत मृत्यू होणे असल्या घटना पाकिस्तानात अगदी सामान्य म्हणाव्यात अशा घडतात.
इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाचवेळेस निर्माण झाले. एखाद्या खंडप्राय देशासारखा मोठा भूभाग लाभलेल्या भारतात बहुभाषिक, अनेकधर्मिय सांस्कृतीक स्थिती असूनही लोकशाही जपली गेली. मात्र पाकिस्तानात राजकीय स्थैर्य फारकाळ टिकले नाही. प्रचाराच्यावेळेस माजी पंतप्रधानांचा बॉम्बस्फोटात खून होणे, पदावरती असलेल्या पंतप्रधानांची हत्या होणे, माजी पंतप्रधानांना फाशी होणे, एखाद्या राजकीय नेत्याचा विमान अपघातात संशयास्पद स्थितीत मृत्यू होणे असल्या घटना पाकिस्तानात अगदी सामान्य म्हणाव्यात अशा घडतात.
भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान नवा देश तयार झाला. 1947 पासून पाकिस्तानात आजवर 29 पंतप्रधान सत्तेत आले असून त्यातील एक पंतप्रधान तर केवळ 4 दिवस पदावरती होते.
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान 50 महिने 2 दिवस पदावरती होते तर त्यांच्यापेक्षा 23 दिवस जास्त कार्यकाळ मिळण्याची संधी युसूफ रझा गिलानी यांना मिळाली. जुल्फीकार अली भुट्टो पाकिस्तानात 46 महिने पंतप्रधान होते. नवाज शरिफ यांना अनेकदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली मात्र ते कधीही कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. अयूब खान हे फक्त चार दिवस पंतप्रधान होते तर नुरुल अमिन 13 दिवस पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या विविध पंतप्रधानांचा कार्यकाळ पुढीलप्रमाणे
पंतप्रधान महिन्यांमध्ये कार्यकाळ
लियाकत अली खान 50 महिने 2 दिवस
ख्वाजा निजामुद्दीन 24 महिने
मुहम्मद अली बोगरा 27 महिने
चौधरी मोहम्मद अली 13 महिने
हुसैन शहीद सुर्हावर्दी 13 महिने
इब्राहिम इस्माइल चुंदरीगर 2 महिने
फिरोज खऱान नून 9 महिने
अयूब खान 4 दिवस
नुरुल अमीन 13 दिवस
झुल्फिकार अली भूट्टो 46 महिने
मोहम्मद खान जुनेजो 38 महिने
बेनझीर भुट्टो 20 महिने
गुलाम मस्तफा 3 महिने
नवाज शरीफ 29 महिने
बलख शेर मजारी 1 महिना
नवाज शरीफ 1 महिना
मोईनुद्दीन अहमद 3 महिने
बेनझीर भुट्टो 36 महिने
मलिक मिराज 3 महिने
नवाज शरीफ 31 महिने
जफरुल्लाह खान जमाली 19 महिने
चौधरी शुजात हुसैन 1 महिना
शौकत अजिझ 38 महिने
मुहम्मद मियाँ सुम्रो 4 महिने
युसुफ रजा गिलानी 50 महिने 25 दिवस
रजा परवेज 9 महिने
मीर हजार खान 2 महिने
नवाज शरीफ 49 महिने
शाहिद खाकान अब्बासी 9 महिने
नसीर उल मुल्क 1 महिना