पाकिस्तानचा खोटेपणा; आता कुलभूषण जाधवना दहशतवादी ठरवण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:02 AM2018-02-07T06:02:52+5:302018-02-07T06:03:18+5:30
हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाध यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर आता दहशतवाद व घातपाताशी आरोप ठेवण्यात आले आहे. जाधव यांना या खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे.
इस्लामाबाद : हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाध यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर आता दहशतवाद व घातपाताशी आरोप ठेवण्यात आले आहे. जाधव यांना या खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जाधव यांच्यावर ठेवेलेले आरोप खोटे आहेत, अशी भारताची भूमिका आहे. तसेच त्यांची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.
जाधव यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जाधव यांना ३ मार्च, २०१६ रोजी बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. जाधव हे इराणमधून पाकिस्तानात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे व आरोप भारताने नाकारले आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यात भारताने लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आव्हान दिले होते त्यानुसार आयसीजेत याचिकेवर अंतिम सुनावणी व्हायची आहे. ‘डॉन’ने या पाकिस्तानी वृत्तपत्राने अधिकाºयांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जाधव यांच्यावर अनेक खटले असून त्यातील दहशतवाद आणि घातपाताशी संबंधित आरोपांच्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणात माहितीची खात्री करून घेण्यासाठी पाकिस्तानने १३ भारतीय अधिकाºयांशी संपर्काची परवानगी मागितली परंतु भारताने सहकार्य केले नाही, असे हा अधिकारी म्हणाल्याचे त्यात म्हटले आहे. पाकिस्तानने कोणते १३ भारतीय अधिकारी होते त्यांची नावे जाहीर केली नाहीत. (वृत्तसंस्था)
>भारत सहकार्य करीत नसल्याचा कांगावा
जाधव यांच्या नौदलातील सेवेची कागदपत्रे, त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या बँक खात्याचा तपशील आणि जाधव यांना मुबारक हुस्सेन पटेल या नावाने दिलेल्या पासपोर्टची माहितीही पाकिस्तानने मागितली आहे. पटेल या नावाने पासपोर्ट कसा दिला गेला व तो अस्सल आहे की बनावट हे पाकिस्तानी अधिकाºयांना हवे आहे.