ब्रिक्समध्ये भारताचा दबदबा पाहून आपल्याविरोधात कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानची चीनकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 01:40 PM2017-09-07T13:40:02+5:302017-09-07T13:48:27+5:30

दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आल्याने, एकीकडे भारताचा हा विजय झाला असताना पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढल्या आहेत

Pakistan's fight against China is due to fear that India will take action against them in the BRICS | ब्रिक्समध्ये भारताचा दबदबा पाहून आपल्याविरोधात कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानची चीनकडे धाव

ब्रिक्समध्ये भारताचा दबदबा पाहून आपल्याविरोधात कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानची चीनकडे धाव

Next

बीजिंग, दि. 7 - दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आल्याने, एकीकडे भारताचा हा विजय झाला असताना पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद आसिफ यासंबंधी चर्चा करण्यासाठी चीनचा दौरा करणार आहेत. गुरुवारी परराष्ट्रमंत्री  मोहम्मद आसिफ चीनला जाणार आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोषणापत्रात उल्लेख करण्यात आलेल्या गोष्टींवर कशाप्रकारे अंमलबजावणी करु शकतो यासंबंधी चीन चर्चा करु इच्छित आहे. तसंच अंमलबजावणी करत असताना चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरला धक्का लागू नये याकडे चीनचं लक्ष आहे. पाकिस्तानने ब्रिक्स घोषणापत्राचा विरोध केला असून यासंबंधी आपला मित्र चीनकडे तक्रार करणार आहे. 

आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने याआधीच चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाही पाकिस्तानने आपला हेका कायम ठेवला आहे.

चीनच्या शीयामेन शहरात सोमवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व प्रकारच्या दहशतवादाची निंदा करणारा ४३ पानी जाहीरनामा जारी केला होता. पाकिस्तानसह अन्य देशांमधील दहशतवादी गटांपासून असलेल्या धोक्याबाबत चिंताही व्यक्त केली होती.

तालिबान, इस्लामिक स्टेट (इसिस), अल-कायदा, पूर्व तुर्किस्तान, उझबेकिस्तानमधील इस्लामी चळवळ तसेच हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए- तोयबा, जैश-ए- मोहम्मद, तेहरिक- तालिबान पाकिस्तान, हिज्ब-उत- तहरीर या अतिरेकी गटांनी चालविलेल्या हिंसाचारामुळे उपखंडातील सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याचा उल्लेखही या जाहीरनाम्यात करण्यात आला होता.

अफगाणिस्तानकडे अंगुलीनिर्देश...
अतिरेक्यांसाठी अफगाणिस्तानातील ४० टक्के भूभाग सुरक्षित असल्याचे सांगत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी उपखंडातील हिंसाचारासाठी अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांना जबाबदार धरले होते. ब्रिक्स सदस्यांनी जारी केलेला जाहीरनामा आम्ही फेटाळत आहोत, असे त्यांनी संरक्षण स्थायी समितीच्या बैठकीत म्हटले होते. काही गट देश सोडून गेले त्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी गटांवर कारवाया केल्या आहेत, असा दावा दस्तगीर यांनी केल्याचे वृत्त जीईओ टीव्हीने दिले होते.

Web Title: Pakistan's fight against China is due to fear that India will take action against them in the BRICS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.