Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 02:29 PM2019-09-18T14:29:57+5:302019-09-18T14:33:46+5:30
Kashmir Issue : काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे.
ब्रुसेल्स - काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे. दहशतवादाच्या मुद्यावरून युरोपियन संसदेतील अनेक देशांच्या नेत्यांनी पाकिस्तानची एका सुरात जळजळीत टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण मिळते, तसेच हे दहशतवादी भारतात हल्ले करतात, त्यामुळे आपण भारताला समर्थन दिले पाहिजे, असे युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सांगितले.
भारत सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न वारंवार उपस्थित करत आहे. मात्र पाकिस्तानचा भारतविरोधी डाव फोल ठरत आहे. आता तर युरोपियन युनियनने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पितळ उघडे पाडले आहे.
युरोपियन युनियनमधील चर्चेत पोलंडचे नेते आणि युरोपियन युनियनमधील प्रतिनिधी रिजार्ड जार्नेकी म्हणाले की, ''भारत जगातील सर्वात महान लोकशाही देश आहे. या देशातील जम्मू काश्मीर या राज्यात होत असलेल्या दहशतवादी कारवायांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. हे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत. तर पाकिस्तानमधून पाठवले जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे.''
Ryszard Czarnecki, European Conservatives&Reformists Group,Poland: India is the greatest democracy of the world. We need to look at terrorist acts that took place in India,J&K.These terrorists didn't land from moon.They were coming from neighboring country.We should support India pic.twitter.com/Q0zdYWd8F8
— ANI (@ANI) September 18, 2019
तर इटलीचे नेते आणि युरोपियन युनियनमधील प्रतिनिधी फुलवियो मार्तुसिलो म्हणाले की, पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करण्याची धमकी देत आहे. पाकिस्तान हा तोच देश आहे जिथे दहशतवादी कट रचून युरोपमध्ये हल्ले घडवून आणतात.'' काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानने चर्चा केली पाहिजे. तसेच या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला पाहिजे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
Fulvio Martusciello,Group of European People's Party (Christian Democrats), Italy: Pakistan has threatened to use nuclear arms. Pak is somewhere where terrorists have been able to plan bloody terrorist attacks in Europe without mentioning tremendous human rights violation in Pak pic.twitter.com/7jhYJSPGNj
— ANI (@ANI) September 18, 2019