Pakistan Missile Test: पाकिस्तानने तोंड लपविले! हवेत झेपावताच फुस्स झाली मिसाईल; भारताला दाखवत होता खुमखुमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 07:40 AM2022-03-18T07:40:25+5:302022-03-18T08:49:08+5:30

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमशोरोच्या रहिवाशांना दुपारी १२ वाजता एक अज्ञात मिसाईल दिसले. ते रॉकेट किंवा मिसाईल सारखे होते, परंतू ते आकाशात ठराविक उंचीवरून अचानक खाली कोसळले. 

Pakistan's missile test fails in Sindh Provenance launch pad, After India's missile hits there land | Pakistan Missile Test: पाकिस्तानने तोंड लपविले! हवेत झेपावताच फुस्स झाली मिसाईल; भारताला दाखवत होता खुमखुमी

Pakistan Missile Test: पाकिस्तानने तोंड लपविले! हवेत झेपावताच फुस्स झाली मिसाईल; भारताला दाखवत होता खुमखुमी

Next

भारताचे सुरपसोनिक मिसाईल डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पाकिस्तानी जमिनीवर कोसळल्याने तिळपापड झालेल्या पाकिस्तानने भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतू, भारताने तांत्रिक चूक म्हणत पाकिस्तानचे सर्व दावे, अटी फेटाळून लावल्या आहेत. हे मिसाईल अडविता न आल्याने या पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारताला झुकविण्याची नामी संधू चालून आली होती, परंतू तेवढी लायक यंत्रणाच नसल्याने हाताची बोटे मोडत बसण्याशिवाय पर्याय काहीच नव्हता. यामुळे पाकिस्तानने गुरुवारी मिसाईल टेस्ट केली. 

पाकिस्तानने गुरुवारी केलेली मिसाईल टेस्ट फेल गेली. अद्याप याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतू पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमशोरोच्या रहिवाशांना दुपारी १२ वाजता एक अज्ञात मिसाईल दिसले. ते रॉकेट किंवा मिसाईल सारखे होते, परंतू ते आकाशात ठराविक उंचीवरून अचानक खाली कोसळले. 

पाकिस्तानची सिंधमध्ये चाचणी सुरु असते. तिथे त्यांचे चाचणी केंद्र आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार ११ वाजता परिक्षण केले जाणार होते. परंतू ते तासभर टाळले गेले. मिसाईल डागल्यानंतर काही सेकंदातच ते मिसाईल त्याच्यामार्गावरून शक्तीहीन होत खाली कोसळले.

पाकिस्तानातील काही वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे कव्हरेज केले असले तरी पाकिस्तानी अधिकारी मात्र मौन बाळगून आहेत. पाकिस्तानच्या सोशल मीडियानुसार, स्थानिक प्रशासनाने असा कोणताही दावा नाकारला आहे. हा एक नियमित मोर्टार ट्रेसर राउंड आहे जो जवळून डागला गेला होता. परंतु ट्रेसर प्रक्षेपण कमाल पाच किमीच्या मोर्टारमध्ये इतके जास्त असेल याची शक्यताच नाही. यामुळे ती मिसाईल असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

Web Title: Pakistan's missile test fails in Sindh Provenance launch pad, After India's missile hits there land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.