पाकिस्तानची मुंबई विमानसेवा 11 मे पासून स्थगित

By admin | Published: May 6, 2017 01:27 PM2017-05-06T13:27:43+5:302017-05-06T14:11:04+5:30

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची कराची-मुंबई ही साप्ताहिक विमानसेवा स्थागित करण्याचा पाकिस्तान विमान कंपनीचा निर्णय.

Pakistan's Mumbai flight suspended from May 11 | पाकिस्तानची मुंबई विमानसेवा 11 मे पासून स्थगित

पाकिस्तानची मुंबई विमानसेवा 11 मे पासून स्थगित

Next

आॅनलाइन लोकमत

नाशिक, दि. 6 - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स अर्थात पीआयएने मुंबई-कराची विमान सेवा येत्या 11 मे पासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही पाकिस्तानची राष्ट्रीय विमान सेवा असून त्याद्वारे आठवड्यातून एकदा कराची-मुंबई विमान सेवा कार्यन्वित आहे. दर मंगळवारी ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान एअरलाइन्सने घेतला आहे.


ही विमानसेवा अचानक स्थगित करण्याचं कारण कळू शकलेलं नाही. मात्र पीआयएच्या अधिकृत प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने ही सेवा सुुरू ठेवणे व्यवस्थापनाला आर्थिक दृट्या सोयीचे नाही. मात्र तेच एकमेव कारण नसावे असे दिसते. यामागे भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणावही कारणीभूत आहेच. अर्थात असे असले तरी सध्या कराची आणि लाहोरहून दिल्लीसाठी असलेली विमानसेवा मात्र पीआयएने सुरुच ठेवलेली आहे.


त्यासंदर्भात मात्र अजून काही नवीन सूचना लागू करण्यात आलेली नाही. पीआयएच्या वतीने सेवा स्थगितीच्या माहितीपलिकडे अन्य माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भातला निर्णय काल जाहीर झाल्यापासून दोन्ही देशांतल्या समाज माध्यमात याविषयी बरीच चर्चा होताना दिसते आहे. त्यात सामान्य जनतेपासून भारत-पाकिस्तान विषयांतले तज्ज्ञही सक्रिय झालेले दिसतात.


एक सामान्य तर्क असा वर्तवला जात आहे की, खरोखरच उभय देशांतील तणावामुळे आणि व्हिसा प्रक्रिया किचकट असल्याने प्रवासी संख्या कमी असेल आणि ही विमानसेवा चालवणं आर्थिकदृट्या परवडत नसेल. मात्र दुसरा एक तर्क असा की, भारतानं दक्षिण आशियाई देशांसाठी प्रक्षेपित आणि कार्यन्वित केलेल्या उपग्रहाच्या कक्षेतून पाकिस्तानला वगळलं असल्यानं पाकिस्तान सरकारसह तेथील सर्व नामांकित व्यवस्था दुखावल्या असूच शकतात. भारताला प्रत्यूत्तर म्हणून अशातऱ्हेची पाऊलंही उचलली जात असावीत.


अर्थात या तर्कांना कुठलाच जोरकस आधार नाही. सध्या तरी पाकिस्तानून कार्यन्वित असलेली मुंबईसाठीची एकमेव विमानसेवाही स्थगित करण्यात आलेली आहे. इथं याचीही नोंद घ्यायला हवी की भारताकडून एअर इंडियाची पाकिस्तानसाठीची विमानसेवा स्थगित आहेच. त्यामुळे या दोन देशांतील अंतर आता अधिक वाढणार हे दिसते आहे.

Web Title: Pakistan's Mumbai flight suspended from May 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.