पाकिस्तानची आण्विक शक्ती महत्वाची समस्या - डोनाल्ड ट्रम्प
By admin | Published: March 30, 2016 11:43 AM2016-03-30T11:43:53+5:302016-03-30T11:46:05+5:30
आण्विक सशस्त्र पाकिस्तान अत्यंत महत्वाची समस्या असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. ३० - आण्विक सशस्त्र पाकिस्तान अत्यंत महत्वाची समस्या असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटलं आहे. तसंच देशातील परिस्थितीवर पाकिस्तानने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत.
पाकिस्तान अत्यंत महत्वाची समस्या असून तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. पाकिस्तानकडे आण्विक नावाचं शस्त्र आहे, त्यामुळे पाकिस्तान देश आपल्यासाठी महत्वाचा आहे. पाकिस्तानने देशातील परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत.
लाहोरमध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्याचादेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी उल्लेख केला. ख्रिश्चनांची संख्या जास्त असल्या कारणाने हल्ला केला गेला. यामध्ये ख्रिश्चनांव्यतिरिक्त अन्य लोकांचाही मृत्यू झाला आहे, ही अत्यंत धक्कादायक आहे. मी कठोर इस्लाम दहशतवादाबद्दल बोलत असून इतर कोणापेक्षाही मी व्यवस्थितरित्या ही समस्या मी सोडवू शकतो असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.