पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:43 PM2020-04-21T13:43:55+5:302020-04-21T13:45:49+5:30

फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे यादीमध्ये पाकिस्तानचे नाव आहे.

Pakistan's played big game; Over 4,000 terrorists 'disappeared' from ban list hrb | पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब'

पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब'

Next

इस्लामाबाद : कोरोनाच्या संकटकाळातही पाकिस्तानकडूनभारतामध्ये दहशवादी कारवाया सुरुच आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदूंवरही अत्याचार करण्यात येत आहेत. आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेल्या पाकिस्तानची नवी खेळी समोर आली आहे. पाकिस्तानने तब्बल ४००० हून अधिक दहशतवाद्यांना गायब केले आहे. 


पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मदतीचा वापर भारताविरोधात दहशवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला आहे. तसेच चीनसह अन्य संस्थांकडून लाखो कोटी डॉलरची कर्जे उचलली आहेत. यामुळे पाकिस्तानवर कर्जबुडवा देश म्हणून शिक्का बसलेला असताना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी कर्ज मिळणे मुश्किल बनले आहे. काळ्या यादीच्या उंबरठ्यावर असल्याने तेथून पुन्हा बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने मोठी चाल खेळली आहे. 


फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे यादीमध्ये पाकिस्तानचे नाव आहे. जागतिक मदत मिळविण्यासाठी पाकिस्तानला काहीही करून या यादीतून बाहेर यायचे आहे. यासाठी गेल्या १८ महिन्यांपासून निरिक्षण यादीमध्ये असलेल्या हजारो दहशतवाद्यांची नावेच गायब करण्यात आली आहेत. जूनमध्ये FATF ची बैठक होणार आहे. FATF ने पाकिस्तानला २७ मुद्द्यांवर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली होती. यासाठी जूनपर्यंतचा वेळ दिला होता. 


अमेरिकी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जनरलनुसार पाकिस्तानची नॅशनल काऊंटर टेररिझम अथॉरिटी ही दहशतवाद्यांची यादी सांभाळते. याचा उद्देश अशा लोकांसोबत आर्थिक संस्था, बँकांनी व्यवहार न करणे हा आहे. या लिस्टमध्ये २०१८ मध्ये ७६०० नावे होती. गेल्या १८ महिन्यांत हा आकडा ३८०० वर आला आहे. एवढेच नाही तर यंदा मार्चपासून आतापर्यंत १८०० नावे हटविली आहेत. 


एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे हटविल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. तर पाकिस्तानी अधिकाऱ्याने हे पाऊल म्हणजे देशातील दहशतवादी विरोधी प्रयत्नांना मजबूत बनविण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. तर अमेरिकेचा माजी सल्लागार राहिलेल्या पीटर पैटेटस्की यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे हटविणे असामान्य असल्याचे म्हटले आहे.

 

आणखी वाचा...

कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप

'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे

कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?

'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या

योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता

किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

Web Title: Pakistan's played big game; Over 4,000 terrorists 'disappeared' from ban list hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.