भ्रष्टाचारावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ आणि लष्कर प्रमुखांमध्ये जुंपली
By admin | Published: April 23, 2016 05:16 PM2016-04-23T17:16:29+5:302016-04-23T17:24:27+5:30
पनामा पेपर्स लीकमध्ये नाव आल्यावरुन पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी अप्रत्यक्षरित्या केलेल्या टीकेला पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी उत्तर दिलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. २३ - पनामा पेपर्स लीकमध्ये नाव आल्यावरुन पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी अप्रत्यक्षरित्या केलेल्या टीकेला पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी उत्तर दिलं आहे. टीव्हीवरुन देशातील जनतेला संबोधित करताना 'मी फक्त देव आणि जनतेसमोर झुकणार असल्याचं', पंतप्रधान नवाझ शरिफ बोलले आहेत. 'पनामा पेपर्स लीकप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचंही', नवाझ शरीफ यांनी सांगितलं आहे.
लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन सहा वरिष्ठ अधिका-यांना बडतर्फ केलं आहे. 'जोपर्यंत भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकत नाही तोपर्यंत दहशतवादाविरोधात सुरु असलेला लढा शांतता आणि स्थिरता आणू शकत नाही.त्यामुळे विश्वासार्हता गरजेची आहे', असं राहिल लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी म्हटलं होतं.
राहिल शरीफ यांचा पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्यावर निशाणा होता असे बोलले जात आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांना अस्थिर करण्यासाठी ही कारवाई केली गेली असल्याची चर्चा आहे. लष्कर प्रमुख राहिल शरीफ अधिका-यांनी बडतर्फ करण्याची कारवाई केल्यानंतर लगेचच दुस-या दिवशी पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी देशवासियांना संबोधित आपली बाजू स्पष्ट केली.
पनामा पेपर्स लीकमध्ये नाव आल्यापासून विरोधक नवाझ शरिफ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. 'जे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आरोप करत आहेत त्यांनी समोर येऊन पुरावे द्यावेत असं आव्हान देतो. माझ्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्यास मी तात्काळ राजीनामा देईल. माझ्याविरोधातील आरोप खोटे सिद्ध झाले तर आरोप करणार देशाची माफी मागणार का? आणि देश त्यांना माफ करेल का ?', असा सवाल पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी विचारला आहे.
निवडणूक आयोगाने नवाझ शरिफ यांची संपत्ती नुकतीच जाहीर केली आहे. नवाझ शरिफ यांची 200 कोटींची मालमत्ता असून पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत राजकारणी बनले आहेत. फक्त 4 वर्षात नवाझ शरिफ यांची संपत्ती 100 कोटींनी वाढली आहे.