अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, अन्यथा अमेरिकन सैन्य घुसेल पाकिस्तानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 05:38 PM2017-10-27T17:38:14+5:302017-10-27T17:46:57+5:30

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन बुधवारी भारतात आले होते.  या दौ-यादरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.

Pakistan's ultimatum to Pakistan, otherwise the American military would go to Pakistan | अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, अन्यथा अमेरिकन सैन्य घुसेल पाकिस्तानात

अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, अन्यथा अमेरिकन सैन्य घुसेल पाकिस्तानात

Next
ठळक मुद्देकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादाचे नेटवर्क मोडून काढावे अन्यथा आम्ही वेगळया मार्गाने जाऊ.

वॉशिंग्टन - पाकिस्तानने आपल्या भूमीवरुन चालणा-या दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करावी. अन्यथा अमेरिका आपल्या पद्धतीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बीमोड करेल असा स्पष्ट संदेश अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटनांची सुरक्षित आश्रयस्थळे नष्ट केलीच पाहिजेत असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी पाकिस्तानला सांगितले आहे. 

रेक्स टिलरसन यांनी नुकताच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताचा दौरा केला. पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादाचे नेटवर्क मोडून काढावे अन्यथा आम्ही वेगळया मार्गाने जाऊ आणि आमच्या पद्धतीने कारवाई करु असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हीथर नॉरेट म्हणाले. आम्ही आमच्या अपेक्षा अनेकदा पाकिस्तानला सांगितल्या आहेत. आता त्यांनी ठोस कारवाई केली पाहिजे असे हीथर म्हणाले. 

सुषमा स्वराजांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानातील दहशतवादावर चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन बुधवारी भारतात आले होते.  या दौ-यादरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिलरसन यांच्यासमोर पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा मांडला.  टिलरसन यांच्या भारत दौ-याच्या अजेंड्यामध्ये भारत-अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याशिवाय आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनचा वाढत्या प्रभावाला विरोध दर्शवण्याच्या प्रयत्नांचाही समावेश आहे. 

दरम्यान, भारतासोबतचे संबंध अमेरिकेसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत याची झलक टिलरसन यांचा भारत दौरा सुरू होण्यापूर्वीच पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या भूमीतून भारताविरोधात होणा-या दहशतवादी कारवाया न थांबल्यानं नाराजी जाहिररित्या व्यक्त केली.
दक्षिण आशियातील आपला पहिला दौरा सुरू करण्यापूर्वी टिलरसन यांनी आक्रमक धोरणांवरुन चीनवर टीका केली. तर दुसरीकडे, दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानलाही खडेबोल सुनावले. पाकिस्तानातील सक्रिय दहशतवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी  आणखी प्रयत्न करावे लागतील, असा पुनरुच्चार करत टिलरसन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. 

Web Title: Pakistan's ultimatum to Pakistan, otherwise the American military would go to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.