पाकिस्तानने शेजारी राष्ट्रांशी चर्चा करण्याचा अमेरिकेचा सल्ला
By admin | Published: April 30, 2016 12:32 PM2016-04-30T12:32:26+5:302016-04-30T12:32:26+5:30
पाकिस्तानने आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत संबंध सुधारण्यासाठी चर्चा करावी असा सल्ला अमेरिकेने दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 30 - पाकिस्तानने आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत संबंध सुधारण्यासाठी चर्चा करावी असा सल्ला अमेरिकेने दिला आहे. 'शेजारी राष्ट्रांसोबत पाकिस्तानसचे संबंध ताणलेले आहेत. त्यांच्यात नेहमी चढ उतार होत आहे. मात्र चर्चा केल्याने प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे चर्चा सुरु राहावी', असं मत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी व्यक्त केलं आहे.
मार्क टोनर यांनी यावेळी बोलताना एफ16 लढाऊ विमाने पाकिस्तानला विकण्यासंबंधीच्या निर्णयावरही चर्चा केली. 'स्थानिक सुरक्षा आणि इतर महत्वाचे मुद्दे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. स्थिर आणि सुरक्षित पाकिस्तानासाठी आमची सुरक्षा मदत योगदान देत असल्याचं', टोनर यांनी सांगितलं आहे.
'दहशतवाद्यांशी लढा देण्यासाठी पाकिस्तानला एफ16 विमाने विकून पाठिंबा देणं योग्य आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी गटांशी याआधीदेखील अशाच प्रकारे लढा दिला गेला होता', असं मत टोनर यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकन सिनेटने मात्र ओबामा प्रशासनाच्या पाकिस्तानला आठ एफ 16 लढाऊ विमाने विकण्याच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. 700 मिलियन डॉलरच्या किंमतीत ही विमाने विकण्यात येणार होती.