पान १ पाकिस्तान

fsharetweetwhatsapp

पान १ पाकिस्तान

By admin | Published: September 1, 2014 09:34 PM2014-09-01T21:34:01+5:302014-09-01T21:34:01+5:30

पिाकस्तानातील पेच कायम

ाकस्तानातील पेच कायम
आंदोलक सचिवालय, पीटीव्हीच्या कार्यालयात घुसले
लष्कर प्रमुख शरीफांना भेटले; पंतप्रधान पायउतार होणार?
इस्लामाबाद : विरोधकांनी गेल्या तीन आठवड्यापासूनचे आंदोलन अधिक आक्रमक करून सचिवालय आणि सरकारच्या पाकिस्तान टीव्ही कार्यालयावर हल्ला केल्याने पाकिस्तानमधील पाकिस्तानमधील राजकीय संकट गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. अशातच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी सोमवारी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिल्याच्या अफवांना ऊत आला आहे.
शरीफ सरकारवरील सावट अधिक गडद होत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी इम्रान खान आणि ताहीर उल कादरी यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करून या दोघांची कोंडी केली आहे. या दोघांना केव्हाही अटक होऊ शकते.
लष्कराने पाकिस्तानमधील सर्व पक्षांना राजकीय कोंडीवर शांततापूर्व तोडगा काढण्याचे आवाहन केल्यानंतर तासभरानंतर इम्रान खान आणि कादरी यांचे समर्थक सचिवालयात धडकले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत चकमक उडाली. दगडफेक करीत आंदोलक दरवाजा तोडत आत घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, रबरी गोळीबार आणि अश्रुधुराचाही वापर केला; परंतु, आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे तो निष्प्रभ ठरला. आंदोलकांनी तेथे जोरदार तोडफोड करीत प्रचंड नासधूस केली.
सचिवालयावर धडक दिल्यानंतर आंदोलकांनी पाकिस्तान टेलिव्हिजनच्या कार्यालवरही जोरदार हल्ला चढविला. लष्कर येण्याआधीच जवळपास ८०० आंदोलकांनी आत घुसले. तेथील कॅमेर्‍यासह इतर साहित्यांची तोडफोड करून त्यांनी प्रसारण बंद पाडले. लष्कराने धाव घेत आंदोलकांना तेथून बाहेर काढून पीटीव्ही कार्यालय ताब्यात घेतले. गेल्या ४८ तासात घडलेल्या हिंसक घटनात तीन जण ठार ५५० जण जखमी झाले आहेत.
सरकार आणि लष्कराने फेटाळले वृत्त....
या राजकीय संकटावर तोडगा काढण्यासाठी लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान शरीफ यांना पायउतार होण्याचा सल्ला दिल्याच्या बातम्या पसरल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर सरकार आणि लष्कराने स्वतंत्रपणे निवेदन जारी करून हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले.
तीन महिन्यांसाठी राजीनामा द्यावा?
मागील सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराची स्वतंत्र आयोगामार्फत चौकशी होईपर्यंत तीन महिन्यांसाठी नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला लष्कर प्रमुखांनी दिल्याचे वृत्त दुनिया टीव्हीने दिल्याने शरीफ यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरल्या.
ते आमचे कार्यकर्ते नाहीत!
पाकिस्तान टीव्ही कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांनी ते आमचे कार्यकर्ते नसल्याचा खुलासा केला.
.....................................................

Web Title: Pan 1 Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.