पनामा प्रकरणाचे धक्के सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2016 03:01 AM2016-04-08T03:01:17+5:302016-04-08T03:01:17+5:30
पनामा पेपर्स जाहीर झाल्यानंतर खळबळजनक घटना घडत आहेत. स्वीस अधिकाऱ्यांनी युरोपियन फुटबॉलच्या मुख्यालयावर छापा घातला
जिनिव्हा : पनामा पेपर्स जाहीर झाल्यानंतर खळबळजनक घटना घडत आहेत. स्वीस अधिकाऱ्यांनी युरोपियन फुटबॉलच्या मुख्यालयावर छापा घातला, तर आइसलँडला नवे पंतप्रधान मिळाले व मोठ्या औषध कंपनीचे विलीनीकरण बारगळले.
जिनिव्हातील युनियन आॅफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (यूईएफए) कार्यालयांची पोलिसांनी चॅम्पियन्स लीगच्या टेलिव्हिजन हक्कांच्या प्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून झडती घेतली.
आइसलँडचे कृषिमंत्री सिगुरदुर इंगी जोहान्नस्सन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. पनामातील बँकांमध्ये सिगमुंदूर डेव्हिड गुन्नलाऊगस्सन यांनी गुंतवणूक केल्याचे उघड झाल्यावर त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेथे आता येत्या हिवाळ्यात निवडणुका होणार आहेत.
पनामामुळे फायझर या कंपनीचे अलेगरनमध्ये होणारे विलीनीकरण बारगळले आहे.