कोण आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची 'गर्लफ्रेन्ड'? अब्जावधीच्या संपत्तीमुळे आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:25 PM2021-10-04T17:25:22+5:302021-10-04T17:26:48+5:30
Pandora papers leak : आरोप आहे की पुतिनच्या सहकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धन जमा करण्यासाठी आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी टॅक्स हेवनच्या खात्यांचा वापर केला होता.
पेंडोरा पेपर्स लीक (Pandora papers leak) प्रकरणातून अनेक देशातील नेते, अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यातून त्यांचे आर्थिक रहस्य समोर आल्याचा दावा केला गेला आहे. या पेपर्समद्ये रशियाचे ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचंही नाव समोर येत आहे. आरोप आहे की पुतिनच्या सहकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धन जमा करण्यासाठी आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी टॅक्स हेवनच्या खात्यांचा वापर केला होता.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, Pandora Papers दावा करतात की, पुतिन यांचे सहकारी गुप्त संपत्ती जमा करत होते. त्यांची कथित गर्लफ्रेन्डचं स्वामित्व असलेल्या एका कंपनीने ३० कोटीचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं. २००३ मध्ये एक २८ वर्षीय महिला Svetlana Krivonogikh त्याची खरी मालक होती.
पेंडोरा पेपर्समध्ये पुतिन यांच्या Monaco मधील गुप्त संपत्तीबाबतही उल्लेख आहे. त्यांच्या कथितपणे परदेशात असलेल्या एका कंपनीबाबतही खुलासा करण्यात आला आहे आणि दावा केला आहे की, या कंपनीचं स्वामित्व त्यांच्या गर्लफ्रेन्डकडे आहे.
असंही सांगण्यात आलं की, पुतिन यांच्यासोबत मैत्री झाल्यानंतर महिलेने (कथित गर्लफ्रेन्ड) सेंट पीटर्सबर्गमध्ये एक फ्लॅट, मॉस्कोमध्ये काही प्रॉपर्टी आणि एक क्रूज खरेदी केला आहे. ज्याची किंमत १०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. दावा केला जात आहे की, पुतिन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्या महिलेचे दिवस बदलले.
दरम्यान याआधीही पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवून दिली होती. पनामा पेपर लीकमधून मोठ मोठ्या लोकांची टॅक्स चोरी समोर आली होती. आता पेंडोला पेपरने खुलासा केला आहे की, कशाप्रकारे जगभरातील शक्तीशाली आणि श्रीमंत लोक संपत्ती जमा करत आहेत.