पाकमध्ये प्रक्षोभ

By admin | Published: August 31, 2014 03:51 AM2014-08-31T03:51:48+5:302014-08-31T05:15:48+5:30

पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात ७ निदर्शक ठार झाले, तर २०० ते २५० निदर्शक जखमी झाले आहेत.

Panic in Pakistan | पाकमध्ये प्रक्षोभ

पाकमध्ये प्रक्षोभ

Next
इस्लामाबाद :  गेल्या दोन आठवडय़ापासून  संसद परिसरात धरणे देणा-या इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या हजारो समर्थकांनी हातात लाठय़ा घेत आणि कठडे तोडत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात  ७ निदर्शक ठार झाले, तर २०० ते २५० निदर्शक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २५ पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारने संघर्षात्मक पवित्र घेत या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
 मध्यरात्रीच्या सुमाराला निर्माण झालेल्या या गंभीर स्थितीमुळे   इस्लामाबाद शहरातील अतिमहत्त्वाच्या परिसर तणावग्रस्त बनला आहे. तणाव वाढताच पंतप्रधान शरीफ लाहोरकडे रवाना झाले आहेत.   पाकिस्तान तेहरीक-ए- इन्साफचे नेते इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तेहरकीचे नेते ताहीर उल कादरी यांनी निदर्शनाचे ठिकाण बदलण्याची घोषणा करताच निदर्शक  शरीफ आणि त्यांच्या सरकारविरोधी जोरदार घोषणा देत नॅशनल अॅसेम्ब्ली येथून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे चालते झाले. नॅशनल अॅसेम्ब्लीपासून 5क्क् मीटर अंतरावर पंतप्रधान शरीफ यांचे निवासस्थान आहे. या रस्त्यावर कठडे म्हणून कंटेनर उभे करण्यात आले. ते हटविण्यासाठी निदर्शकांनी कटर्सचा वापर केला. आंदोलकांच्या संघर्षात्मक पवित्र्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने फौज धाडली आहे.  पोलिसांच्या गोळीबारात एक महिला ठार झाली.
 
माङया मागे या..
या मोर्चाचे नेतृत्व मी करणार असून माङया समर्थकांनी माङया मागे यावे. मी सांगत नाही तोवर  महिला आणि मुलांनी आहे तेथेच थांबावे, असे आवाहन इम्रान खान यांनी करताच त्यांच्या समर्थकांनी तयारीनिशी शरीफ यांच्या निवासस्थानाच्या दिशेने कूच केले. 
 
आंदोलनाचे लोण कराचीपर्यंत.. 
इस्लामाबादमध्ये रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांचे लोण मध्यरात्री कराची आणि लाहोरपर्य्रंत पोहोचले. कराची आणि लाहोरमध्येही शेकडो जणांनी रस्त्यावर उतरून इस्लामाबाद येथील घटनेचा निषेध करीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 
 
सैन्याला पाचारण .. 
इस्लामाबाद येथे सुरू झालेले विरोध प्रदर्शनाचे लोण कराची, लाहोरपर्यंत पोहोचले. हे विरोध प्रदर्शन मोडून काढण्यासाठी सरकारने पाकिस्तानी सैन्याला पाचारण केले आहे. 

 

Web Title: Panic in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.